भारतविरोधी मुशफिक्वल फजल अन्सारे यांची बांग्लादेश सरकारकडून राजदूतपदी नेमणूक

Source : The Business Standard
Mushfiqul Fazal Ansarey : बांग्लादेश अंतरिम सरकारकडून पत्रकार मुशफिक्वल फजल अन्सारे यांची राजदूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात उघडपणे टीका करणारे आणि  भारतातल्या काही राजकीय घटनांवर पाश्चात्य देशांत जाऊन  टीकाटिपण्णी करणारे भारत विरोधी पत्रकार अशी मुशफिक्वल फजल अन्सारे  यांची मुख्य ओळख आहे. 
[gspeech type=button]

बांग्लादेश अंतरिम सरकारकडून पत्रकार मुशफिक्वल फजल अन्सारे यांची राजदूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात उघडपणे टीका करणारे आणि  भारतातल्या काही राजकीय घटनांवर पाश्चात्य देशांत जाऊन  टीकाटिपण्णी करणारे भारत विरोधी पत्रकार अशी मुशफिक्वल फजल अन्सारे  यांची मुख्य ओळख आहे.  त्यामुळे पंतप्रधान मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारकडून मुशफिक्वल अन्सारे यांची राजदूतपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाकडे भारतात शंकेच्या नजरेने पाहिले जात आहे. 

मुशफिक्वल अन्सारे हे गेली 10 वर्ष  बांग्लादेशाबाहेर राहत होते. शेख हसीना या बांग्लादेशाच्या पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यावर दिनांक 12  सप्टेंबर 2024 रोजी अन्सारे हे बांग्लादेशमध्ये परत आले. त्यानंतर अंतरिम राजनैतिक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, कोणत्या देशात त्यांना नेमण्यात येणार आहे त्याविषयी स्पष्टता अजून दिलेली नाही आहे. 

मुशफिक्वल अन्सारे यांचे राजकीय संबंध 

अन्सारे हे 2000 ते 2006 या काळात  पंतप्रधान खालिदा झिया यांचे साहाय्यक प्रेस सचिव होते. खालिदा झिया या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्या आहेत. या पक्षासोबत अन्सारे यांचे चांगले संबंध आहेत.

पत्रकारीतेतील कारकीर्द

अन्सारे हे बांग्लादेश टेलिव्हिजनमध्ये अँकर म्हणून आणि त्यापूर्वी द डेली इत्तफाक  या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कार्यरत होते. ‘हॅलो एक्सीलन्सी’ या टिव्ही शोच्या माध्यमातून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. या शो मध्ये ते विविध देशातल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असत.  

बांगलादेश सोडल्यानंतर ते वॉशिग्टंनमध्ये स्थायिक झाले. वॉशिग्टंन डिसीमध्ये त्यांनी फॉरिंग पोलिसी मॅग्झिनचे (साऊथ आशिया पर्सपेक्टिव्ह)  एक्झीक्यूटिव्ही एडिटर पद भूषवलं. जस्ट न्यूज बीडी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी व्हाइट हाऊस करस्पाँडंट म्हणून काम केलं आहे. 

अमेरिकेतल्या या पत्रकारितेच्या कारकिर्दीत त्यांनी मानवी हक्कांचं उल्लंघन आणि बांग्लादेशमधली राजकीय परिस्थिती, पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार या विषयांवर सातत्याने भाष्य केलं आहे. 

अन्सारे यांच्या भारतविरोधी कारवाया

अन्सारे यांनी जेव्हा संधी मिळेल तेव्हा भारतातील विरोधी पक्षांच्या परिस्थितीवर, घटनांवर अमेरिकेतील माध्यमांसमोर चर्चा केल्याचे आढळून येते. यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांना, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविषयी आणि ऐन निवडणुकीच्या काळात सत्ताधारी भाजपा पक्षाने काँग्रेस पक्षाची बँक खाती का गोठवली या घटनांचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केला. यावरून राजनैतिक तणाव निर्माण झाला होता.  

त्यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून, भारतातल्या अमेरिका दुतावासातील अधिकारी ग्लोरिया बरबेना यांना या घटनेविरोधात निषेध नोंदवण्यासाठी समन्स बजावले होते. 

यापूर्वी 2024 लोकसभा निवडणुकीत भारतात कशाप्रकारे विरोधी पक्षाला संपवून टाकण्याचा प्रयत्न केला जातो या विषयावरही त्यांनी अमेरिकेत भाष्य केलं होतं. या सगळ्या घटनांवरुन भारतातील राजकीय घडामोडींवर अमेरिकेतील माध्यमांसमोर भाष्य करुन भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न अन्सारे यांनी वेळोवेळी केल्याचं उघड झाले आहे. त्यामुळे त्यांना भारतविरोधी म्हणून गणले जाते. 

अन्सारे यांच्या विरोधातले वाद

सन 2015 साली संयुक्त राष्ट्रातल्या बांग्लादेश प्रतिनिधींनी अन्सारे यांना पत्रकार या नात्याने पत्रकार परिषदेत सहभागी होण्यावरुन आक्षेप घेत अन्सारे हे एक राजकीय व्यक्ती असून त्यांचे राजकीय संबंध उघड केले. 

9 ऑक्टोबर रोजी अन्सारे यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये, भारत बांग्लादेशमध्ये दखलबाजी करत असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, ‘बांगलादेशमध्ये अनेक मुद्द्यांवर भारतीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेतले जातात. माजी हुकुमशाहा हसीना या भारतातून बांग्लादेशमध्ये अस्थिरता निर्माण करत आहेत.’ 

अन्सारे यांना बांग्लादेश आणि भारताचे संबंध पटत नव्हते हे स्पष्ट होतं. अन्सारे हे बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीचे पेड पत्रकार आहेत अशी टीका बांग्लादेशचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री हसन मेहमुद यांनी केली होती. 

सन 2022 साली, बांग्लादेश सरकारने अन्सारे विरोधात डिजीटल सिक्युरिटी एक्ट अंतर्गत देशाची प्रतिमा मिलन करत असल्याचा आरोप दाखल केला. 

अन्सारे यांना राजकीय बक्षीस

मुशफिक्वल अन्सारे यांचे बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीसोबतचे संबंध हे उघड आहेत. त्यांनी खालिदा झिया यांच्या सत्ताकाळात त्यांच्यासोबत कामही केलं आहे.

त्यांनी त्यांच्या संपूर्ण पत्रकारितेच्या काळात आवामी लीगच्या म्हणजेच हसीना शेख यांच्या सरकारविरोधात टीका-टिपण्णी केली आहे. याच पत्रकारीतेचं बक्षीस म्हणून अन्सारे यांना हे राजदुतपद बक्षीस म्हणून मिळाल्याची चर्चा स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Air travel: प्रवाशांना यापुढे विमानतळावर चेक-इन करण्याची किंवा बोर्डिंग पास बाळगण्याची गरज भासणार नाही.आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने यासाठी पुढाकार
Luna Recycles Mission : अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यामध्ये मानवी विष्ठा, मूल विसर्जन आणि उलट्या यासारख्या
Dire wolves : सुमारे साडेबारा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेला अतिशय हिंस्र शिकारी प्राणी – डायरे वुल्फ (Dire Wolf) आता

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ