दुबईच्या राजकुमारी शेख महराचा ‘डिवोर्स’ (Divorce) परफ्यूम

शेख महराने त्यांच्या नवीन परफ्युमचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला आणि 'DIVORCE' by Mahra M1' या ब्रँडची लगेचच सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु झाली आहे.
[gspeech type=button]

दुबईच्या राजकुमारी आणि उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची कन्या शेख महरा, सध्या त्यांच्या नव्या परफ्यूम लॉन्चमुळे चर्चेत आहेत. आठ आठवड्यांपूर्वी शेख महराने सोशल मीडियावर पतीपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली होती. आता त्यांनी ‘डिवोर्स’ (Divorce) नावाचा एक नवीन परफ्यूम लॉन्च करून, पुन्हा एकदा व्यावसायिक जगात प्रवेश केला आहे.

‘डिवोर्स’ परफ्यूमची विशेषता

शेख महराने त्यांच्या नवीन परफ्युमचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या टीझरमध्ये तुटलेल्या काचा, गडद काळ्या पाकळ्या आणि छोटे काळे दगड दिसत आहेत. परफ्युमच्या बाटलीसह असलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे, “‘DIVORCE’ by Mahra M1”. या ब्रँडची लगेचच सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु झाली आहे.

2023 मध्ये लग्न, 2024 मध्ये विभक्त

शेख महराचे लग्न 2023 मध्ये शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी झाले होते. मे 2024 मध्ये त्यांना एक मुलगी झाली. तिचं नाव शेख महरा यांनी शेख माना बिन मोहम्मद अल मकतूम ठेवले. मात्र, जुलै महिन्यात शेख महराने तिच्या पतीवर दुसऱ्या महिलांशी संबंध असल्याचे आरोप करत घटस्फोटाची घोषणा केली होती. इस्लामिक पद्धतीनुसार ‘तीन वेळा तलाक’ देत तिने पतीपासून विभक्त होण्याचे जाहीर केले होते.

शेख महरा कोण आहेत?

शेख महरा ही दुबईच्या सत्ताधारी कुटुंबातील एक प्रमुख सदस्य आहे. महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी ब्रिटनमधील विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदवी प्राप्त केली आहे. शेख महरा या सोशल मीडियावर देखील खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे 9,80,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत.

शेख महरा यांनी घटस्फोटानंतर व्यावसायिक जगात एक नवीन सुरुवात केली आहे. ‘डिवोर्स’ या परफ्यूममुळे त्यांनी आपल्या आयुष्यातील क्लेशदायक अनुभवाला नवीन स्वरूप दिले आहे. त्यामुळं त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Air travel: प्रवाशांना यापुढे विमानतळावर चेक-इन करण्याची किंवा बोर्डिंग पास बाळगण्याची गरज भासणार नाही.आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने यासाठी पुढाकार
Luna Recycles Mission : अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यामध्ये मानवी विष्ठा, मूल विसर्जन आणि उलट्या यासारख्या
Dire wolves : सुमारे साडेबारा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेला अतिशय हिंस्र शिकारी प्राणी – डायरे वुल्फ (Dire Wolf) आता

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ