कोल्हापूरच्या स्ट्रीट फूडची धम्माल!

Food : कोल्हापूर हे नाव ऐकलं की तोंडाला पाणी सुटतं. कारण या शहरात अशी अनेक स्ट्रीट फूडची ठिकाणं आहेत की, जिथे गेल्यावर तुमचं पोट आणि मन दोन्ही भरून येईल. खरे कोल्हापुरी पदार्थ चाखायचे असतील तर तुम्हाला कोल्हापूर या सुंदर शहरात जायलाच हवे.
[gspeech type=button]

कोल्हापूर हे नाव ऐकलं की तोंडाला पाणी सुटतं. कारण या शहरात अशी अनेक स्ट्रीट फूडची ठिकाणं आहेत की, जिथे गेल्यावर तुमचं पोट आणि मन दोन्ही भरून येईल. खरे कोल्हापुरी पदार्थ चाखायचे असतील तर तुम्हाला कोल्हापूर या सुंदर शहरात जायलाच हवे. म्हणजे फक्त खाण्यासाठीच कोल्हापूर ट्रीप तुम्ही प्लान करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोल्हापूरच्या काही प्रसिद्ध स्ट्रीट फूड्सबद्दल.

1. श्यामचा वडा

कोल्हापूरमध्ये वडापाव खायचा असेल तर श्यामचा वडा चुकवायचा नाही. त्यांचा वडा खूपच मस्त असतो. बटाटा वडा, ब्रेड स्लाइस आणि तळलेल्या मिरच्यांची जोडी खूपच चांगली लागते.

पत्ता: जुना पुणे-बंगलोर हायवे, शिवाजी विद्यापीठ रोड, राजाराम कॉलेज, कोल्हापूर

2. राजाभाऊ भेळ

कोल्हापूरमध्ये भेळ म्हणजे राजाभाऊ भेळ हे समीकरण पिढ्यांपासूनच आहे. यांच्याकडे भेळचे अनेक प्रकार आहेत. त्यांच्या तिसऱ्या पिढीनेही पहिल्या पिढीची चव आणि गुणवत्ता आजही कायम राखली आहे.

पत्ता: एसटी कॉलनी, महालक्ष्मीनगर, राजारामपुरी, कोल्हापूर

3. दावणगिरी बेण्णे दोसा

मऊ आणि चविष्ट दोसा खायचा असेल तर. दावणगिरी लोणी दोसा हे एक उत्तम ठिकाण आहे. त्यांच्याकडचे दोसे बेण्णे म्हणजे भरपूर लोण्यासोबत सर्व्ह केला जातो. बटाटा घसी म्हणजे पातळ भाजी आणि नारळ चटणी यांच्यासोबत हा दोसा खूपच चांगला लागतो.

पत्ता: अर्ध शिवाजी पुतळा, क प्रभाग, कोल्हापूर

4. विक्रांत पाव भाजी

पाव भाजी खायला गेलात तर विक्रांत पाव भाजी हे एक चांगले ठिकाण आहे. त्यांची पाव भाजी खूपच मस्त आणि मसालेदार असते. त्यांचा व्हेज पुलाव देखील चांगला असतो.

पत्ता: मंगळवार पेठ, मंगळवार पेठ, कोल्हापूर,

5. मांसाहारी खाद्य पदार्थ

कोल्हापूर मांसाहारी पदार्थांसाठीही प्रसिद्ध आहे. तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा ही कोल्हापुरची विशेष ओळख आहे. याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही पद्मा हॉटेल, पाटलाचा वाडा, हॉटेल पर्ल, सर्किट हाऊस कॅन्टीन, हॉटेल गावकर, ७/१२ आणि ओपल या ठिकाणी खास कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा, मटण फ्राय, मटण लोणचं या पदार्थांवर ताव मारू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Tea : आपल्या देशात अनेक ठिकाणी असा चहा मिळतो जो आपल्या घरात बनवलेल्या चहापेक्षा चवीला वेगळा असतो. साधारणपणे, चहाची चव
Mahakumbh 2025 : महाकुंभ हा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे. या धार्मिक अनुभवासोबतच, प्रयागराजमधील खाद्यपदार्थांची चवही खूपच खास
The biryani market in Tamil Nadu : तमिळनाडूमध्ये बिर्याणीचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. सध्या या उद्योगाची एकूण किंमत 10,000 कोटी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ