आपल्या सर्वांच्या आवडीची आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशी आवळा कँडी आपण घरच्या घरीच बनवू शकतो. चला तर मग, घरच्याघरी आवळा कँडी कशी बनवायची ते पाहूया!
साहित्य
आवळे, गूळ किंवा साखर, तूप, मीठ, सैंधव मीठ, मिरपूड, चाट मसाला, जिरेपूड, ओवा, पिठी साखर
कशी बनवायची आवळा कँडी?
सर्वात आधी आवळे स्वच्छ धुऊन, एका भांड्यात पाणी घालून उकळून घ्या. नंतर उकळलेले आवळे थंड करून, त्यांच्यातील बिया काढून टाका. बिया काढलेले आवळे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि एका पॅनमध्ये तूप गरम करून, त्यात वाटलेला आवळा आणि गूळ/साखर घालून मिक्स करा. या मिश्रणात मीठ, सैंधव मीठ, मिरपूड, चाट मसाला, जिरेपूड आणि ओवा घालून चांगले मिक्स करा.
मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे-छोटे गोळे करून, पिठी साखरेत रोल करा. तुमची स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आवळा कँडी तयार आहे
आवळा कँडी शिजवताना सतत ढवळत रहा, जेणेकरून ती चिकटणार नाही. गोळे करताना हातांना थोडेसे तूप लावल्याने गोळे व्यवस्थित बनतील आणि आवळा कँडी हवाबंद डब्यात ठेवा त्यामुळे त्या अधिक काळ चांगल्या राहतील.
आवळा कँडीचे फायदे
आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. आवळा खाल्याने पचनक्रिया सुधारते आणि अॅसिडिटीची समस्याही दूर होते. आवळा त्वचेसाठीही फायदेशीर असून, त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.
या हिवाळ्यात आपल्या घरातील सर्वांना आवडेल अशी ही आवळा कँडी नक्कीच बनवा