स्टारलिंक डिव्हाईस नेमकं काय असते?

Starlink Device : स्टारलिंक या खासगी उपग्रहाच्या माध्यमातून मोबाईल युजर्सना थेट उपग्रहावरून (सॅटेलाईटवरून) इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देता येते. अमेरिकेतले उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीची ही उपकंपनी आहे. 
[gspeech type=button]

मणिपूरमध्ये गेल्या दोन दिवसापासून पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर लष्कराकडून मणिपूरच्या इंफाल पूर्व, चुराचंदपूर, चंदेल आणि कांगपोकपी या भागात शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेत लष्करांनी 29 शस्त्रे जप्त केली. या शस्त्रासोबतच लष्करांना स्टारलिंक डिव्हाईस’ सुद्धा आढळून आलं. या डिव्हाईसमुळे सुरक्षा यंत्रणेमध्ये मोठी खळबळ माजली आहे. 

यापूर्वी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ड्रग्ज तस्करीच्या शोध मोहिमेमध्ये लष्करांना हे सॅटेलाईट डिव्हाईस सापडलं होतं. त्यावेळी समुद्री मार्गातून येणारं 4.2 दशलक्ष अमेरिकन डॉलरचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. या स्मगलिंगसाठी नेव्हिगेशनसाठी स्टारलिंकचा उपयोग केल्याचं आढळून आलं होतं.  

दरम्यान, भारतामध्ये स्टारलिंकची कोणतीही सेवा अधिकृत दिली जात नसल्याचं स्पष्टीकरण एलॉन मस्क यांनी आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवरून दिले आहे. 

काय आहे स्टारलिंक डिव्हाईस?

स्टारलिंक हा एक खासगी मालकीचा उपग्रह आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून मोबाईल युजर्सना थेट उपग्रहावरून (सॅटेलाईटवरून) इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देता येते. अमेरिकेतले उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीची ही उपकंपनी आहे.  आत्तापर्यंत 100 देशांमध्ये या मार्फत सेवा पुरवली जात आहे. 

स्टारलिंकची सुरुवात

सन 1980 च्या दशकाच्या मध्यात बॅलेस्टीक मिसाईल्सवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कमी वेळेत अशा मिसाईल्स निकामी करण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेत काही उपग्रह तैनात करण्याची एक कल्पना मांडण्यात आली होती. मात्र, त्यावेळच्या मोठ्या आर्थिक खर्चामुळे हा प्रकल्प बुडीत निघाला.  

स्पेस एक्सचे स्ट्रॅटेजिक रिलेशन उपाध्यक्ष लॅरी विल्यम्स आणि टेलिडिसिकच्या “इंटरनेट इन द स्काय” कार्यक्रमाचे माजी उपाध्यक्ष यांनी 2004 मध्ये पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह सोडण्याच्या कल्पनेवर काम करुन वॉशिग्टंन डिसी इथं कार्यालय सुरू केलं. जून 2014 मध्ये स्पेसएक्सने “सामायिक धोरणात्मक दृष्टी” चा भाग म्हणून सरे सॅटेलाइट टेक्नॉलॉजी (SSTL) मध्ये शेअर्स विकत घेतलं. त्यावेळी ही सरे सॅटेलाइट टेक्नॉलॉजी अंतराळामध्ये इंटरनेटचा विस्तार करण्याचं काम करत होती. पण या कंपनीने पुढे 2008 मध्ये नेव्हिगेशन आणि पृथ्वी निरीक्षणावर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे स्पेसएक्सचा हिस्सा EADS Astrium ला विकून टाकला. 

तब्बल दहा वर्षांनी म्हणजे 2014 च्या सुरुवातीस, इलॉन मस्क आणि ग्रेग वायलर यांनी एकत्र येऊन वर्ल्डव्हू या नावाची योजना आखली. या योजनेअंतर्गत सुमारे 700 सॅटेलाईटची साखळी प्रक्षेपित करण्याचं ठरवण्यात आलं होतं.  1980 साली जी इरिडियम सॅटेलाईट साखळी समुहाची योजना होती, त्याच्या 10 पट मोठी ही योजना होती. पण ही योजना अर्ध्यावरच राहिली. त्याऐवजी स्पेस एक्सने STEAM नावाच्या नॉर्वेजियन कम्युनिकेशन्स अथॉरिटीमार्फत आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघामध्ये (ITU) अर्ज दाखल केला. पुढे फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनसोबतच स्टारलिंकला परवानगी देण्याची विनंती केली. त्यानंतर स्पेस एक्सने त्यांच्या सॅटेलाइट ब्रॉडबँड नेटवर्कसाठी युनायटेड स्टेट्समध्ये स्टारलिंक हे नाव ट्रेडमार्क केलं. 

या सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर एलॉन मस्क यांनी 2019 मध्ये स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली.

स्टारलिंकचा वापर

या डिव्हाईसच्या माध्यमातून इंटरनेट यूजर्सना सॅटेलाईटवरून थेट इंटरनेट सुविधा पुरवली जाते. ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी फायबर केबल्स, नेटवर्क टॉवर्ससारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देता येत नाहीत, अशा ठिकाणी या डिव्हाईसचा उपयोग करता येतो. तसेच नैसर्गिक आपत्ती वा मानवनिर्मित आपत्तीमुळे जर इंटरनेट सुविधा विस्कळीत झाली असेल, तर ती पुन्हा पूर्वपदावर येईपर्यंत सुद्धा इंटरनेट वापरकर्ते या डिव्हाईसच्या माध्यमातून इंटरनेट वापरू शकतात. 

सन 2019 साली स्टारलिंकचं प्रक्षेपण झाल्यापासून काही देशांच्या लष्करी तळावर या डिव्हाईसचा वापर केला जात आहे. 

रशिया – युक्रेन युद्धामध्ये रशियाने युक्रेनमधल्या इंटरनेट संबंधित पायाभूत सुविधा उद्धवस्त केल्यामुळे, युक्रेन सरकारने स्टारलिंक सुविधा वापरण्यास सुरूवात केली. युक्रेनियन सैन्यांना स्टारलिंगद्वारे मोफत सेवा दिली जाते. 

त्यानंतर इस्त्रायल – हमास युद्धामध्येही गाझा पट्टीमध्येही या डिव्हाईसचा वापर सुरू झाला. 

सन 2022 साली यूएस स्टेट डिपार्टमेंट आणि यूएस ट्रेझरी डिपार्यमेंटने हे डिव्हाईस तंत्रज्ञान इराणमध्ये देण्याचा निर्णय घेतला. इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाब सक्तीविरोधातल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकन सरकारने हा निर्णय घेतला. आणि या निर्णयानुसार त्यांनी तातडीने इराणमध्ये स्टारलिंक सेवा सुरू केली. मात्र, इराण सरकारने अमेरिकेच्या या हस्तक्षेपाला विरोध करत इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनकडे तक्रार नोंदवली. या खटल्यामध्ये  इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने इराण सरकारच्या बाजुनं निर्णय देत ही स्पेसएक्सला ही इंटरनेट सुविधा स्थगित करण्याचे निर्देश दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Cyber Guidelines for using AI in Art : सायबर सुरक्षितता, कला जोपासण्या सबंधातली नैतिकता आणि बौध्दिक मालमत्ता हक्क-अधिकार जोपासण्यासाठी महाराष्ट्र
Pet Cloning Market in china : क्लोनिंगचे एवढे प्रचंड दर असूनही चीनमध्ये आपल्या पाळीव प्राण्याचं क्लोनिंग करण्याचं प्रमाण अधिक आहे.
Kancha Gachibowli : सरकारला गरज पडली की सरकारी जमिनींचा लिलाव करायचा हा अघोषित, अलिखित कायदाच बनला. तेलंगणा सरकारनेही सरकारी तिजोरी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ