नेव्ही डे

4 डिसेंबर 1971 रोजी भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करत विजय मिळवला. 'मिशन ट्रायडंट' असं या मिशनला विशेष नाव दिलं होतं. या विजयाच्या स्मरणार्थ 4 डिसेंबरला 'नौदल दिन' साजरा करण्यात येऊ लागला. भारतीय नौदलाला अधिक सक्षम आणि समुद्री तटाचं रक्षण करणाऱ्या देशातील प्रमुख पाणबुड्या पाहुयात.

आयएनअस अरिहंत (S2) - आयएनअस अरिहंत S2 ही पहिली भारतीय बनावटीची शीप मर्सिबल बॅलेस्टिक न्यूक्लिअर स्वरूपातील पाणबुडी आहे. कारगिल युद्धाच्या विजयानिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या विजय दिनी म्हणजे 26 जुलै 2009 साली हिचे अनावरण झाले. त्यानंतर अनेक ट्रायल घेतल्यानंतर 2016 पासून ती प्रत्यक्षात वापरण्यात येऊ लागली.

आयएनएस अरिघाट (S3) - आयएनअस अरिघाट S3 ही पाणबुडी 2017 मध्ये लाँच करण्यात आली. अलिकडेच या पाणबुडीमध्ये अत्याधुनिक बदल करत ऑगस्ट 2024 पासून ती स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडमध्ये सहभागी झाली.

आयएनएस अरिधमन (S4) - आयएनएस अरिधमन (S4) ही स्वदेशी शीप मर्सिबल बॅलेस्टिक न्यूक्लिअर स्वरूपातील पाणबुडी असून 2021 मध्ये ती लाँन्च केली होती.

एस 4 - स्वदेशी शीप मर्सिबल बॅलेस्टिक न्यूक्लिअर साखळीतील ही सगळ्यात अत्याधुनिक पाणबुडी असून ऑक्टोबर 2024 मध्ये ही पाणबुडी लाँच केली.

आयएनएस कलवारी (एस21) - नौदलातील सहा कलवारी वर्गातील पाणबुड्यापैकी ही पहिली पाणबुडी आहे. फ्रेंच नौदल संरक्षण आणि ऊर्जा कंपनीने डिझाइन केलेली आणि माझगाव डॉक लिमीटेडने बनवलेली डिझेल-इलेक्ट्रिक अशी ही पाणबुडी आहे.

आयएनएस खांदेरी (एस 22) - माझगाव डॉक लिमिटेड येथे तयार करण्यात आलेल्या सहा स्वदेशी कलवारी साखळीतील ही पाणबुडी असून 28 सप्टेंबर 2019 मध्ये ती समुद्रामध्ये तैनात करण्यात आली.

आयएनएस वागशीर - स्वदेशी बनावटीच्या पाणबुडी निर्मिती प्रकल्प 75 मधली ही शेवटची पाणबुडी असून 20 एप्रिल 2022 मध्ये ती लाँच करण्यात आली होती. सध्या तिचे ट्रायल्स सुरू असून आता डिसेंबर 2024 मध्ये ती तैनात करणं अपेक्षित आहे.

इतर बातम्या

Black Flowers : हिवाळ्यामध्ये बागेत तशी फुलांची संख्या कमी असते. पण काही विशेष काळ्या रंगाची फुले हिवाळ्यातच पाहायला मिळतात आणि
National birds : विविध देशांचे राष्ट्रीय पक्षी वेगवेगळे असतात आणि प्रत्येक देशाचा राष्ट्रीय पक्षी त्या देशाच्या संस्कृती, इतिहास आणि पर्यावरणाशी
Gopinath Munde : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज जयंती. राजकीय आणि सामाजिक नेते म्हणून गोपीनाथराव मुंडे यांची विशेष ओळख आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ