व्हिसाची तयारी

Visa : अमेरिकन व्हिसा हे नाव उच्चारले की, बरेचसे समज-गैरसमज ऐकायला मिळतात. अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, हे पाहुयात. अमेरिकन व्हिसासाठी दोन बाबींची पूर्तता करावी लागते. एक म्हणजे आर्थिक कागदपत्रे आणि दुसरे म्हणजे व्हिसासाठीची मुलाखत.
[gspeech type=button]

अमेरिकन व्हिसा हे नाव उच्चारले की, बरेचसे समज-गैरसमज ऐकायला मिळतात. अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, हे पाहुयात. अमेरिकन व्हिसासाठी दोन बाबींची पूर्तता करावी लागते. एक म्हणजे आर्थिक कागदपत्रे आणि दुसरे म्हणजे व्हिसासाठीची मुलाखत.

साधारणपणे आर्थिक कागदपत्रांची खालीलप्रमाणे विभागणी करता येईल.

कुटुंबाची आर्थिक बचत

विविधप्रकारे केलेली आर्थिक गुंतवणूक

कुटुंबाची वार्षिक प्राप्ती

कुटुंबाची स्थावर मालमत्ता

एज्युकेशन लोन

हे पाचही विभाग अत्यंत महत्वाचे आहेत. या पाचही विभागांना एकत्रितपणे पाहून व्हिसाचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे माझ्याकडे एका विभागात जास्त तरतूद आहे, त्यामुळे दुसऱ्या विभागात कमी चालेल असे नव्हे. या सगळ्या मुद्द्यांचा आपण विस्तृतपणे विचार करूयात.

कुटुंबाची आर्थिक बचत

व्हिसाला जाताना आर्थिक बचत (सेव्हिंग अकाउंट) खात्यामध्ये, विद्यार्थ्याच्या पहिल्या वर्षाचा खर्च असणे अपेक्षित असते. हा खर्च किती असू शकतो याची माहिती विद्यार्थ्याच्या I-20 ह्या कागदपत्रांमध्ये केलेली असते. हे सेविंग्स अकाउंट असावे. हे खाते नियमितपणे वापरात असावे. नवीन अकाउंट उघडून त्यात ही रक्कम जमा न केलेली बरी. सहसा सेव्हिंग अकाउंटमध्ये 15 ते 20 लाख रुपये  एवढी रक्कम कुणीही ठेवत नाही. पण व्हिसासाठी ही रक्कम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि महत्वाचे म्हणजे ही रक्कम हळूहळू खात्यामध्ये जमा केलेली असावी जेणेकरून ते नैसर्गिक वाटेल. ही रक्कम कुठून आली याचे स्पष्टीकरण असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखादी  प्रॉपर्टी विकून रक्कम उभी केलेली असेल तर त्यासंबंधीची कागदपत्रे तयार असावीत. थोडक्यात ह्या रकमेबद्दल कागदोपत्री आणि तोंडी स्पष्टीकरण व्हिसा ऑफिसरला अपेक्षित असते. त्यामुळे यासाबंधीची सर्व मूळ कागदपत्रे व्हिसाला घेऊन जाणे गरजेचे आहे. जे बचत खाते आपण दाखवतो ते विद्यार्थी अथवा पालकांच्या नावावर असावे. एकापेक्षा जास्त खाती चालू शकतात. पण कागदपत्रांच्या सोयीच्या दृष्टीने शक्यतो जास्त खाती नसावीत.

विविधप्रकारे केलेली आर्थिक गुंतवणूक

 सेव्हिंग अकाउंट आणि स्थावर मालमत्ता सोडून बाकी सर्व प्रकारची गुंतवणूक या गटात मोडते. यात मुदत ठेवी (FD), रिकरिंग डिपॉझीट, पीएफ, पीपीएफ, एनएससी (NSC), पोस्टातील गुंतवणूक, सोने (सोन्याचे valuation) आणि इतर अनेक गुंतवणुकीचा समावेश होतो. ह्या सर्व गुंतवणुकीची मूळ कागदपत्रे असणे आवश्यक आहे. जर सेव्हिंग अकाउंट मधील पैसे हा पहिल्या वर्षाचा खर्च असतो, तर ही गुंतवणूक दुसऱ्या वर्षाच्या खर्चाची provision म्हणून दाखवावी लागते.

कुटुंबाची वार्षिक प्राप्ती

दोन वर्षाचा खर्च दाखवल्यानंतर कुटुंबाची वार्षिक प्राप्ती काय आहे, हेदेखील महत्वाचे आहे. कारण कुटुंबाकडे नियमित उत्पन्नाचा स्त्रोत असणे आवश्यक आहे. यासाठी उत्पन्नावर भरलेल्या कराचे(IT Returns) पुरावे ग्राह्य धरले जातात. जर शेतीविषयक उत्पन्न असेल तर त्याचे देखील योग्य पुरावे असणे आवश्यक आहे.

स्थावर मालमत्ता

विद्यार्थी आर्थिकदृष्या चांगल्या पार्श्वभूमीतून आलेला आहे हे दाखवण्यासाठी  स्थावर मालमत्ता (प्रॉपर्टी) असणे आवश्यक आहे. यामध्ये राहते घर, प्लॉट याचा समावेश करता येतो. त्यासाठी मालमत्तेची कागदपत्रे आणि त्या मालमत्तेचे सरकारमान्य वॅल्यूअरकडून valuation केलेली कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. 

आर्थिक कागदपत्रे हे अमेरिकन व्हिसाचे एक अत्यंत महत्वाचे अंग आहे. वर उल्लेख केलेली सर्व मूळ कागदपत्रे व्हिसा मुलाखतीच्या दिवशी विद्यार्थ्याबरोबर असणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणा हा निकष अमेरिकन व्हिसा देताना अत्यंत महत्वाचा मानला जातो. त्यामुळे कागदपत्रांची तयारी वेळेवर करून व्हिसाला गेलेले चांगले असते.  ह्या लेखातील माहिती अनुभवावर आधारलेली आहे. व्हिसासाठी तयारी करताना तज्ज्ञांशी चर्चा करूनच पुढचे पाऊल टाकावे.

एज्युकेशन लोन

एज्युकेशन लोन म्हणजे उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या खर्चासाठी घेतले जाणारे कर्ज. हे कर्ज विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत पुरवते. भारतात एज्युकेशन लोनसाठी बऱ्याच बँका आणि NBFC लोन देतात. यामध्ये ट्युशन फी, लिविंग कॉस्ट, प्रवास खर्च आणि इतर संबंधित खर्चांचा समावेश होतो.

या कर्जाची परतफेड (EMI) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहसा 6 महिन्यांपासून 1 वर्षानंतर  सुरू होते.

आजकाल भरपूर बँका secured किंवा unsecured एजुकेशन लोन देतात. संबंधीत बँकांशी बोलून त्या प्रमाणे documents तयार करून त्यांना देता येतात.

याप्रमाणे सगळ्या डॉक्युमेंट्सची पूर्तता करून व्हिसा साठी अप्लाय करू शकतो.

16 Comments

  • Sarika Shind

    खूपच उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगितली आहे. अनेक शंकांची व प्रश्नांची उत्तरे लेखातून मिळतात. सर्वसामान्यांना लगेच समजेल अशा पद्धतीने लिहिले आहे.

  • Prasad Sarwade

    Khup sunder ✨

  • Jadhav sir

    Very nice

  • Bhakti Santosh Patil

    Very well said 🙌🏻

  • Bhagyashree

    मस्त माहिती पूर्ण लेख

  • Medha kulkarni

    Khup point to point Ani savistar mahiti dili ahe khup chan 👍

  • HARSHAL VAIDYA

    Great 👍

  • Atharva Ghatwal

    This is great information! For people unfamiliar with the English language, this provides excellent details in their native language.

  • Uma shinde

    मंजु खुप सुंदर आणि समजेल अशी माहिती सांगितली.

  • Rajendra

    Nice info..

  • नितीन पाटील

    अतिशय महत्वाची आणि उपयुक्त माहिती. फक्त आर्थिक गुंतवणुकीत म्युच्युअल फंड आणि स्टॉक गुंतवणुकीचा उल्लेख राहिला आहे.

  • Pravin Kulkarni

    उपयोगी आणि विस्तृत महिती

  • Pravin Kulkarni

    खुपचं छान आणि सर्वांच्या उपयोगी

    • Ashwini Vaidya

      खूपच महत्त्वाची माहिती आहे.
      नक्कीच ह्या सगळ्याचा उपयोग होईल.

  • Ujjwala moon

    Madam,tumhi खुप विस्तृत माहीती पण अगदी सोप्या भाषेत, सर्वांना समजेल अश्या प्रकारे दिली आहे. ज्यांना विदेशात जायचे आहे त्यांच्यासाठी उपयुक्त अशीच आहे…मनातल्या शंकांचे समाधान त्यात आहे…धन्यवाद आपले…

  • Ira Khedkar

    very succinct and to the point!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

16 Responses

  1. Madam,tumhi खुप विस्तृत माहीती पण अगदी सोप्या भाषेत, सर्वांना समजेल अश्या प्रकारे दिली आहे. ज्यांना विदेशात जायचे आहे त्यांच्यासाठी उपयुक्त अशीच आहे…मनातल्या शंकांचे समाधान त्यात आहे…धन्यवाद आपले…

    1. खूपच महत्त्वाची माहिती आहे.
      नक्कीच ह्या सगळ्याचा उपयोग होईल.

  2. अतिशय महत्वाची आणि उपयुक्त माहिती. फक्त आर्थिक गुंतवणुकीत म्युच्युअल फंड आणि स्टॉक गुंतवणुकीचा उल्लेख राहिला आहे.

  3. मंजु खुप सुंदर आणि समजेल अशी माहिती सांगितली.

  4. This is great information! For people unfamiliar with the English language, this provides excellent details in their native language.

  5. खूपच उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगितली आहे. अनेक शंकांची व प्रश्नांची उत्तरे लेखातून मिळतात. सर्वसामान्यांना लगेच समजेल अशा पद्धतीने लिहिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ