मराठवाड्यातील औरंगाबाद शहरातील खाद्य संस्कृतीतही खास वेगळेपण आहे. शहरभर अनेक चविष्ट, उत्तम पदार्थ मिळतात.
खुलताबादचा खाजा
औरंगाबादच्या जवळ असलेला खुलताबाद तालुका त्याच्या खास खाजासाठी प्रसिद्ध आहे. हजरत ख्वाजा मुंतजीबोद्दिन जर जरी बक्ष यांच्या उरसाच्या वेळी या खाजाची विशेष लोकप्रियता आहे. खाजा हा एक गोड पदार्थ आहे, जो मैदा, साखर, खवा, आणि तूप यापासून तयार होतो. उरुसाच्या वेळी सुमारे दीडशे दुकाने खाजा विक्रीसाठी थाटली जातात
इमरती
हा प्रसिद्ध गोड पदार्थ आहे जो औरंगाबादच्या गुलमंडी भागातील “उत्तम मिठाई भांडार” मध्ये मिळतो. इमरती तयार करण्यासाठी उडदाची डाळ, मैदा आणि तूप वापरून त्यात गोडवा घालण्याची विशिष्ट पद्धत आहे. त्याची चव इतकी सुंदर आहे की, परदेशात राहणारे भारतीयही इमरतीचा आस्वाद घेण्यासाठी ऑर्डर करतात. एक किलो इमरती साधारणतः 360 रुपये किमतीची असते.
कैलास पावभाजी
पावभाजी हा मराठवाड्याचा आवडता पदार्थ आहे आणि औरंगाबादमध्ये कैलास पावभाजी सेंटरमध्ये बनवलेली पावभाजी तर खूपच प्रसिद्ध आहे. सिडको भागात असलेल्या या पावभाजी सेंटरमध्ये स्पेशल पावभाजी, मसाला पाव, खडी पावभाजी, बटर पाव आणि इतर चविष्ट पदार्थ मिळतात.
केल्विन 77
एमजीएम कॉलेजजवळ असलेले केल्विन 77 हे तरुणाईचे आवडते ठिकाण आहे. औरंगाबादमध्ये सर्वात आधी लाइव्ह रोल आइसक्रीम हा प्रकार घेऊन येण्याची कमाल यांनी केली आहे. इथलं लाइव्ह रोल आइसक्रीम तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत.
लाइव्ह रोल आइसक्रीमध्ये आइसक्रीम आइस्ड ग्रिलवर ओतलं जातं आणि त्यावर निरनिराळ्या फळांसोबत, फ्लेवर्ससोबत मिक्स करून सव्र्ह केलं जातं.
पहाडी सँडविच
औरंगाबादमधील सीडको भागातील लक्ष्मीनारायण सँडविच आणि पिझ्झा सेंटर मध्ये मिळणारे पहाडी सँडविच प्रसिद्ध आहे.150 पेक्षा जास्त प्रकारचे सँडविच आणि पिझ्झा इथे उपलब्ध आहेत. जर तुम्हाला काहीतरी नवीन आणि वेगळे खायचे असेल तर नक्की एकदा इथे भेट द्या.