नाशिकमधील किलबिल शाळेसमोरील खाऊगल्ली

Street Food Nashik : तुम्हाला डोरेमॉन पराठा, डोरेमॉन आलू पराठा, डोरेमॉन पनीर पराठा खायचा आहे? तर मग आजचं भेट द्या नाशिकमधल्याकिलबील शाळे समोरच्या खाऊगल्लीला.
[gspeech type=button]

नाशिक शहरातील विविध भागात छोट्या-मोठ्या खाऊगल्ल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची खाऊगल्ली म्हणजे किलबिल शाळेसमोरील खाऊ गल्ली.  या खाऊगल्लीत लहान मुलांसाठी स्पेशल डिशेस तयार केल्या जातात.

रघुवीर पराठा

या गल्लीत रघुवीर पराठाचा स्टॉल खूप प्रसिद्ध आहे. मेथी, पालक, आलू, पनीर असे विविध प्रकारचे पराठे येथे मिळतात. लहान मुलांसाठी डोरेमॉन पराठा, डोरेमॉन आलू पराठा, डोरेमॉन पनीर पराठा असे चविष्ट पर्यायही उपलब्ध आहेत.

जॉस्वॉज स्ट्रीट कॅफे

जॉस्वॉ श्रीवास्तव या तरुणाचं ‘जॉस्वॉज स्ट्रीट कॅफे’ इटालियन, मेक्सिकन आणि बार्बेक्यू सॅण्डविच आणि रॅप्ससाठी प्रसिद्ध आहे.

स्ट्रीट साईड रोल्स अॅण्ड अंडा भुर्जी सेंटर

‘स्ट्रीट साईड रोल्स अॅण्ड अंडा भुर्जी सेंटर याच गल्ली मध्ये आहे. येथे कच्ची पक्की अंडा भुर्जी, अंडा रोल्स, अंडा पनीर रोल, बॉईल भुर्जी अशी विविध प्रकारची डीश मिळतात.

आरसी चाट कॉर्नर

‘आरसी चाट कॉर्नर’ पाणीपुरी, ओली भेळ, दहीपुरी, शेवपुरी, रगडापुरी, दाबेली अशा अनेक प्रकारच्या चाटसाठी प्रसिद्ध आहे. यांच्या पाणीपुरीसोबत मिळणारे पाणी हे अकरा प्रकारच्या मसाल्यांपासून तयार केलेले असते.

विशाल मोमोज सेंटर

विशाल मोमोज सेंटरमध्ये पनीर मोमोज, चीज पनीर फ्राइड, चीज तंदूरी, व्हेज फ्राइड, व्हेज तंदूरी असे मोमोज मिळतात. निखाऱ्यांवर भाजलेले हे मोमोज खवय्यांना खूप आवडतात.

किलबिल शाळेसमोरील ही खाऊगल्ली नाशिकमधील खवय्यांसाठी एक नवीन आकर्षण ठरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Tea : आपल्या देशात अनेक ठिकाणी असा चहा मिळतो जो आपल्या घरात बनवलेल्या चहापेक्षा चवीला वेगळा असतो. साधारणपणे, चहाची चव
Mahakumbh 2025 : महाकुंभ हा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे. या धार्मिक अनुभवासोबतच, प्रयागराजमधील खाद्यपदार्थांची चवही खूपच खास
The biryani market in Tamil Nadu : तमिळनाडूमध्ये बिर्याणीचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. सध्या या उद्योगाची एकूण किंमत 10,000 कोटी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ