हिजाब क्लिनिकची गरज कोणाला? धार्मिक कट्टरवाद्यांना की बंधनं झुगारणाऱ्या महिलांना?

Hijab Treatment Clinic : इराणमध्ये हिजाब सक्तीला आता मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे. यावर इराण सरकारने अजीब तोडगा काढला आहे. हिजाबला विरोध दर्शवणाऱ्या महिला या मानसिक दृष्ट्या आजारी आहेत असं जाहीर केलं आहे. आणि अशा महिलांसाठी हिजाब क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
[gspeech type=button]

इराणमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी हिजाब चुकीच्या पद्धतीने परिधान केल्यामुळे एका विद्यापीठामध्ये विद्यार्थिनीला हटकलं गेलं होतं. याचा निषेध म्हणून ती विद्यार्थिनी विद्यापीठामध्ये अर्धनग्न अवस्थेत विद्यापीठाच्या परिसरात वावरली.

या घटनेनंतर आणखीन कोणत्या महिलेने हिजाबला विरोध करण्याचं धाडस करू नये, म्हणून  इराण सरकारने आता हिजाब क्लिनिक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हे असं क्लिनिक सुरू सुद्धा झालं आहे.  

हिजाबला विरोध करणाऱ्या महिला मानसिकदृष्ट्या आजारी

हिजाबला विरोध करणाऱ्या महिला, तरुण मुली या मानसिक दृष्ट्या आजारी आहेत. त्यांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी या क्लिनिकची आवश्यकता आहे, असं स्पष्टीकरण देत या क्लिनिकची सुरुवात केली जात आहे. धार्मिक संस्थेकडून हे क्लिनिक सुरू केलं जाणार आहे. 

महिलांचा पोषाख कसा असावा, महिलांचे वर्तन यासगळ्या बाबतीत देखरेख करण्यासाठी इराणमध्ये प्रमोशन ऑफ वर्च्यू एंड प्रिवेंशन ऑफ वॉइस’ या  धार्मिक संस्थेकडून नियंत्रण ठेवलं जातं. या संस्थेकडून आता सरकारच्या पाठिंब्याने इराणमध्ये हिजाब क्लिनिक सुरू केली जाणार आहेत. 

मानवाधिकार संस्थाची नाराजी

हिजाब परिधान करावा की नाही हा महिलांचा खासगी प्रश्न आहे. त्याची सक्ती करणे हे चुकीचं असताना हिजाबला विरोध करणाऱ्या महिलांना, तरुणींना मानसिकदृष्ट्या आजारी ठरवणं हे तर त्याहून अधिक धोकादायक आहे, असं मत मानवाधिकारी संस्थांनी व्यक्त केलं आहे. 

इराणमध्ये हिजाबची सक्ती

इराणमध्ये 1979 साली सत्तापालट करण्यासाठी क्रांती घडवून आली. या क्रांतीनंतर सत्तापालट होत खोमेनी यांचे सरकार सत्तेत आलं आणि इराणमध्ये धार्मिक सत्तेचा उदय झाला. त्यामुळे 1979 पूर्वी शाह यांच्या राजवटीमध्ये महिलांवर जास्त निर्बंध नव्हते. मात्र, खोमेनी यांच्या सत्ताकाळात धार्मिक संस्थेचा सत्ताकारणावर मोठा प्रभाव होता. जो आजही आहे. या सत्तांतरणानंतर महिलांच्या सामाजिक हक्कांवर गदा आणली गेली. नोकरी करण्यापासून उच्च शिक्षण घेण्यावरही निर्बंध आणले गेले. 

16 सप्टेंबर 2022  साली तेहरानमधल्या महसा अमिन या 22 वर्षीय महिलेने हिजाब घालण्यास विरोध केला. त्यावेळी तिला नैतिक पोलिसांनी अटक केली आणि तीन दिवस जेलमध्ये ठेवलं. या अटके दरम्यान तिचा मृत्यू झाला. महसा अमिनच्या समर्थनार्थ आणि हिजाबला विरोध दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिला रस्त्यावर उतरल्या. त्यावेळी पोलिसांनी जवळपास 500 हून अधिक आंदोलकांना मारलं. मात्र, तरिही आंदोलन हे मागे हटले नाहीत. आज ही अधुनमधून काही ठिकाणी हिजाबला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलनं आयोजित केली जातात. 

इराण क्रांतीमधला महिलांचा सहभाग

इराणमध्ये धार्मिक कट्टरतेची सत्ता आली ती 1979 च्या क्रांतीनंतर. या क्रांतीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. क्रांतीपूर्वीच्या सत्ताकाळात देशभरात वाढलेली बेरोजगारी, आर्थिक संकट, राजेशाहीला कंटाळून अनेक महिला या खोमेनी यांच्या बाजूनं क्रांतीत उतरल्या. खुद खोमेनी यांनी सुद्धा क्रांती यशस्वी करण्याचे श्रेय हे महिलांना दिलं आहे. 

खोमेनी आपल्या भाषणात त्यावेळी म्हणाले आहेत की, या इस्लामी चळवळीत महिलांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पाठिंब्यावरच देशाचं भवितव्य आधारलेलं आहे. त्यांच्या पुढाकारामुळेच ही धार्मिक लढाई आपण लढू शकतो. त्यानंतर खोमेनी यांनी हिजाबची प्रतिमा दाखवत म्हणाले की, ‘ज्या देशाच्या स्त्रिया या हिजाबसारख्या पोशाखात शाहच्या राजवटीचा निषेध करतील त्या राष्ट्राचा विजय होईल.’ असं म्हणत त्यांनी हिजाबला प्रमुख वस्त्र असल्याचं जाणवून दिलं. 

1979 क्रांती मधला महिलांचा सहभाग लक्षणीय होता. कारण या क्रांतीमध्ये सहभाग घेण्याचं त्यांचं उद्दिष्ट ही आर्थिक प्रगती हे होतं. मात्र, या क्रांतीच्या यशाने धार्मिक सत्तेचा दबाव वाढत गेला. आणि या इराणी महिलांना क्रांतीपूर्व काळात त्यांच्याकडे असलेले शिक्षण, नोकरी, सामाजिक स्वातंत्र्य यासारखे अनेक अधिकार हिरावून घेत धार्मिक रुढीच्या पारतंत्र्यात अडकावं लागलं.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Air travel: प्रवाशांना यापुढे विमानतळावर चेक-इन करण्याची किंवा बोर्डिंग पास बाळगण्याची गरज भासणार नाही.आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने यासाठी पुढाकार
Luna Recycles Mission : अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यामध्ये मानवी विष्ठा, मूल विसर्जन आणि उलट्या यासारख्या
Dire wolves : सुमारे साडेबारा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेला अतिशय हिंस्र शिकारी प्राणी – डायरे वुल्फ (Dire Wolf) आता

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ