पर्यटनाचा ‘रिव्हेंज टुरिझम’ नंतर ‘आयर्न  बट’ चा ट्रेंड

Iron Butt Tourism Trend : फिरण्याची हौस भागवायची आहे पण आर्थिक गणित जुळत नसेल तर या छंदाला मुरड घालावी लागते. अशावेळी लक्झरी टूर करण्याऐवजी साधी, कमी खर्चिक टूरला करणं योग्य. वेगवेगळ्या देशाच्या आणि शहरांच्या सीमा या बस, ट्रेन, मोटरसायकल किंवा थेट सायकलवरून प्रवास करून गाठणे म्हणजेच ‘आयर्न बट ट्रॅव्हलिंग’.
[gspeech type=button]

बदला! हा किती आणि कोणत्या गोष्टीचा असू शकतो? पर्यटनाचाही बदला घेता येऊ शकतो, हा विचार तरी तुमच्या मनात आला आहे का कधी? पण हे घडलंय. 

कोरोनामुळे सलग दोन वर्षे कुठेच पर्यटनासाठी फिरता आलं नाही म्हणून सगळं स्थिरस्थावर झाल्यानंतर संपूर्ण जगातच ‘रिव्हेंज टुरिझम’चा ट्रेंड आला होता. जगभरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्यावर बऱ्याच लोकांनी आता आयुष्याची काही हमी नाही म्हणून जग फिरून, आनंदात जगण्याचा मंत्र फॉलो केला. 

पर्यटनाचा नविन ‘आयर्न बट’ ट्रेंड

‘आयर्न बट’ म्हणजे कमी खर्चात सहल करण्याचा ट्रेंड.  कुठेही फिरायला सहलीला जायचं म्हटलं तर आपण सगळी व्यवस्था ही उत्तम असेल याकडे जास्त भर देतो. म्हणजे फिरायला गेल्यावर कोणतीही गैरसोय झाली पाहिजे नाही. प्रवास करताना ट्रेनच्या फर्स्ट क्लास कम्पार्टमेंटने, एसी बस किंवा विमानाने प्रवास करतो. राहण्यासाठी चांगलं हॉटेल, जेवण असं सगळं उत्तमोत्तम सोयी-सुविधा मिळवण्याचा प्रयत्न असतो. पण या सगळ्यासाठी खिसा सुद्धा चांगलाच रिकामा करावा लागतो. 

तुम्हाला फिरायची खूप आवड असेल आणि वर्षाला दोन-तीन ठिकाणी एक्सप्लोर करायला जायचं असेल तर एवढा खर्च करणं हे परवडणार नसतं. तेव्हा इकडे जी तडजोड केली जाते, तिकडे सुरू होतं ‘आयर्न बट’ ट्रॅव्हलिंग. 

या ट्रॅव्हलिंगमध्ये पर्यटक हे नव्या जागी जाताना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यावर किंवा मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात. कधी सायकलवरून तर कधी मोटरसायकलवरूनही जगाची भ्रमंती केली जाते. आपल्याकडेही अनेक अशी उदाहरणं आहेत, जे दर दोन-तीन वर्षानंतर सायकल किंवा मोटरसायकलवरून परदेशातल्या विविध ठिकाणी भेटी देतात.

तसचं सहलीच्या ठिकाणी पोहोचल्यावर राहण्यासाठी सुद्धा साध्या हॉटेल किंवा हॉस्टेलची निवड करतात. यामुळे या पर्यटकांच्या पैशांची खूप बचत होते आणि त्यांना त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची, नवनवीन स्थळं एक्सप्लोर करण्याची हौस ही भागवता येते. 

‘आयर्न  बट’ ट्रेंडचं क्रेझ

चीनमध्ये हा ट्रेंड आहे. चीनमधल्या कॉलेजवयीन तरुणांमध्ये हा ट्रेंड खूप प्रचलीत आहे. या वयातल्या तरुणांना फिरायची आवड आहे पण जवळ पुरेसे पैसे नसतात. अशावेळी अनेकजण हा पर्याय स्वीकारुन अनेक ठिकाणी फिरण्याची आपली आवड पूर्ण करुन घेतात. 

एलायस शीनशीन या 25 वर्षाच्या तरुणाने अशा पद्धतीने चीनमधल्या आणि परदेशातल्याही तब्बल 42 शहरांना भेटी दिल्या. यासाठी त्याला फक्त 2.35 लाख रूपये खर्च आला.   

तर आणखीन एका 20 वर्षाच्या मुलाने सार्वजनिक वाहतूक जसं बस आणि ट्रेनने प्रवास करत तीन देशांना भेटी दिल्या. त्याने युनान शहरापासून प्रवासाला सुरुवात केलेली. त्यानंतर त्यांनी लाओस, थायलंड आणि मलेशिया या तीन देशांना भेटी दिल्या. 

पेंग फी, ही 27 वर्षीय तरुणी गेल्या वर्षभरापासून मध्य आशिया ते युरोपमधल्या सात देशामध्ये प्रवास करत आहे. कझाकस्तान पासून तुर्कस्तानपर्यंतचा प्रवास तिने बसने केला आहे. या प्रवासा दरम्यान तिने अर्मेनिया, जॉर्जिया या देशांना भेटी दिल्या. फक्त उझबेकिस्तान ते संयुक्त अरब अमिराती हा प्रवास तिने विमानाने केला. बाकी सगळ्या देशांमध्ये तिने बस आणि ट्रेनने प्रवास केला आहे. 

‘आयर्न बट’ प्रवास म्हणजे शिकण्याची संधी

लक्झरी टुरिझम ऐवजी आपला कन्फर्ट झोन सोडून वेगवेगळ्या शहरात, देशात बस, ट्रेन किंवा मिळेल त्या वाहनाने प्रवास करताना खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांशी मिसळता येते. तेथील नियम, पद्धतीही समजतात. संस्कृती, भाषा, खाणंपिणं अशा सगळ्याच गोष्टी अनुभवता येतात. 

एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देणं आणि नवं ठिकाणी, शहरं एक्सप्लोर करणं यामध्ये फरक आहे. आयर्न बट प्रवासामध्ये तुम्ही फक्त पर्यटन स्थळं बघत नाहीत तर तिकडच्या संपूर्ण वातावरणाशी मिळून-मिसळून राहत खऱ्या अर्थाने त्या स्थळांला पूर्ण एक्सप्लोर करता.

‘आयर्न  बट’ टुरिझममुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

‘आयर्न बट’ टुरिझममध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला जातो. त्यामुळे या पैशांची बचत होते. तसचं मोठ-मोठ्या हॉटेलमध्ये वगैरे न राहता साध्या हॉस्टेल किंवा लहान हॉटेलची निवड केली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगार निर्मिती होते. 

रिव्हेंज टुरिझम ते ओव्हर टुरिझम ट्रेंड

कोविडमुळे दोन वर्षांनंतर जगभरात पर्यटकांचा सुळसुळाट झाला होता. त्यामुळे  नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक  ठिकाणी पर्यंटकांच्या गर्दीमुळे पर्यावरणाची हानी होऊ लागली. अशा निसर्गसंपन्न भागामध्ये प्रदुषणाचं संकट ओढवू लागलं. या सगळ्या नकारात्मक परिणामांची जाणीव झाल्यावर आता पुन्हा पर्यटकांकडूनच ओव्हर टुरिझमचा ट्रेंडही आता सुरू होत आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Air travel: प्रवाशांना यापुढे विमानतळावर चेक-इन करण्याची किंवा बोर्डिंग पास बाळगण्याची गरज भासणार नाही.आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने यासाठी पुढाकार
Luna Recycles Mission : अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यामध्ये मानवी विष्ठा, मूल विसर्जन आणि उलट्या यासारख्या
Dire wolves : सुमारे साडेबारा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेला अतिशय हिंस्र शिकारी प्राणी – डायरे वुल्फ (Dire Wolf) आता

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ