14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
मुंबई जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 1290
मुंबई जिल्ह्यातून सर्वाधिक 656 प्रश्न हे काँग्रेसचे मुंबादेवी मतदारसंघाचे आमदार अमीन पटेल यांनी उपस्थित केले आहेत. तर सर्वात कमी प्रश्न शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मांडले आहेत.
या जिल्ह्यातून एकुण तीन महिला आमदार विधीमंडळात जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करत होत्या. पण काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड या नुकताच लोकसभेत निवडून गेल्याने आता दोन महिला आमदार आहेत.
या जिल्ह्यातून कोव्हिडकाळात झालेल्या अधिवेशनांमध्ये एकूण 52 प्रश्न विचारले गेले होते. त्यात महिलांविषयी एक, बालकांविषयी एक आणि आरोग्यविषयी सहा प्रश्न होते. या तुलनेत पूर्ण कार्यकालाच्या आकडेवारीतील महिला व बालकांविषयी विचारलेल्या प्रश्नांची संख्या उल्लेखनीय आहे.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | आदित्य उद्धव ठाकरे (डिसेंबर 2019 ते जून 2022 मंत्री) | शिवसेना. जून 2022 पासून ठाकरे गट | वरळी | 1 |
2 | अजय विनायक चौधरी | शिवसेना. जून 2022 पासून ठाकरे गट | शिवडी | 108 |
3 | अमिन अमीरअली पटेल | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | मुंबादेवी | 656 |
4 | कालिदास नीळकंठ कोळंबकर | भारतीय जनता पक्ष | वडाळा | 153 |
5 | मंगलप्रभात गुमानमल लोढा | भारतीय जनता पक्ष | मलबार हिल | 33 |
6 | आर. तमील सेल्वन (कॅप्टन) | भारतीय जनता पक्ष | सायन-कोळीवाडा | 366 |
7 | राहुल सुरेश नार्वेकर (जुलै 2022 पासून विधानसभेचे सभापती) | भारतीय जनता पक्ष | कुलाबा | 34 |
8 | सदानंद शंकर सरवणकर | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट | माहीम | 47 |
9 | वर्षा एकनाथ गायकवाड | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | धारावी (अ.जा.) | 254 |
10 | यामिनी यशवंत जाधव | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट | भायखळा | 267 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत मुंबई जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- मुंबई शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत,
- मुंबईतील शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याबाबत,
- मुंबई शहर व उपनगरात महावितरणासह बेस्ट, अदानी व टाटा समुहाकडून वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्याकडून होत असलेल्या वीज दरवाढीबाबत,
- मुंबईतील माहूल प्रकल्पग्रस्तांना हक्काची घरे मिळण्याबाबत,
- चेंबूर येथील आणिकगाव महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून झालेली विषबाधा,
- मुंबई महानगरपालिका हद्दीत आरटीई मान्यतेविना 218 खाजगी विनाअनुदानित शाळा सुरु असल्याबाबत,
- हाफकिन बायोफार्मा, मुंबई यांनी स्व-उत्पादित केलेली औषधे विनावापर पडून असल्याबाबत,
- बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई येथे बुलेट ट्रेनच्या कामादरम्यान कामगाराचा झालेला मृत्यू,
- कुर्ला (पश्चिम) मुंबई येथील महानगरपालिकेची शौचालये जमीनदोस्त करुन अनधिकृत बांधकाम केल्याबाबत,
- मुंबई महानगरपालिका रुग्णालयांकरिता खरेदी करण्यात येणाऱ्या औषध खरेदीमध्ये झालेला आर्थिक गैरव्यवहार
- मुंबई महानगरपालिकेकडून विना प्रक्रिया मलजल व सांडपाणी समुद्रात व नद्यांमध्ये सोडण्यात येत असल्याबाबत,
- मिठी नदीच्या खोलीकरणासह रुंदीकरणासाठी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाने आजपर्यंत 1हजार 150 कोटी रुपये खर्च केले असून पूर्ण झालेल्या कामाचे ऑडिट करून शिल्लक असलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याबाबत इत्यादी प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आले आहेत.