हिंगोली जिल्ह्यातील आमदारांचं प्रगतीपुस्तक

Hingoli : विधीमंडळात हिंगोली जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या तिन्ही आमदारांनी उपस्थित केल्या प्रश्नांची संख्या चांगली आहेत.  या जिल्ह्यातून गेल्या विधानसभेत महिला विषयक एकही प्रश्न उपस्थित केला गेला नव्हता मात्र चौदाव्या विधानसभेत या विषयावर तीन प्रश्न विचारले गेले.
[gspeech type=button]

14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921

हिंगोली जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 193

हिंगोली जिल्ह्याशी संबंधीत प्रश्नसंख्या : 56

 

विधीमंडळात हिंगोली जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या तिन्ही आमदारांनी उपस्थित केल्या प्रश्नांची संख्या चांगली आहेत.  या जिल्ह्यातून गेल्या विधानसभेत महिला विषयक एकही प्रश्न उपस्थित केला गेला नव्हता मात्र चौदाव्या विधानसभेत या विषयावर तीन प्रश्न विचारले गेले. राज्यात बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी व लैंगिक छळासंबंधी 1 लाख 7 हजार 448 गंभीर गुन्हे दाखल असून प्रत्यक्षात त्याचे प्रमाण दीडपट अधिक असण्याची शक्यता पोलीस अधिकारी व्यक्त करत आहेत. या प्रकरणांवर कार्यवाही करण्याबाबत प्रश्न उपस्थित केलेला. 

तसेच जिल्ह्यातल्या आरोग्य केंद्रासंबंधीतचे प्रश्न सुद्धा विधीमंडळासमोर उपस्थित करण्यात आले आहेत. 

 

जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या 

क्र आमदाराचे नाव पक्ष मतदारसंघ प्रश्नसंख्या

1

संतोष  बांगर शिवसेना, जून 2023 पासून शिंदे गट   कळमनुरी 102

2

तानाजी मुटकुळे  भाजप  हिंगोली 50
3 चंद्रकांत ऊर्फ राजूभैय्या नवघरे  राष्ट्रवादी, जुलै 2023 पासून शरद पवार गट   वसमत

51

(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)

 

14 व्या विधानसभेत हिंगोली जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –

  • सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्याबाबत
  • जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि खनिज उत्खनन
  • शिधावाटप केंद्रावरील धान्याचा काळाबाजार
  • रस्त्यांची प्रलंबित कामे
  • वसमत येथे हळदी पिकांवर पडलेल्या करपा रोग नियंत्रित करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी कार्यवाही न केल्याबाबत
  • कळमनुरी तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत अधिकाऱ्यांनी केलेला गैरव्यवहार
  • औंढा तालुक्यातील मौजे जवळबाजार येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजन काट्यात होत असलेला गैरप्रकार
  • हिंगोली जिल्ह्यात पाणी नमुने दूषित आढळून आल्याबाबत
  • तसेच कळमनुरी नगर परिषदेत पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल निधीत झालेला गैरव्यवहार इत्यादी महत्त्वपूर्ण प्रश्न सभागृहात उपस्थित केले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ