14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
जालना जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 261
जालना जिल्ह्यासंबंधीत विचारलेले प्रश्नांची संख्या : 43
जालना जिल्ह्यातून भोकरदन मतदारसंघांचे भाजपा आमदार संतोष दानवे यांनी सर्वाधीक 142 प्रश्न उपस्थित केले आहेत.
गेल्या पाच वर्षात विधीमंडळाच्या सभागृहात जिल्हा परिषद शाळांची झालेली दुरावस्था, भोकरदन येथील आरोग्य उपकेंद्र 12 वर्षांपासून बंद असल्याबाबत तसेच जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याबाबतचे प्रश्न सभागृहात उपस्थित केले आहेत.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांनी विचारलेले प्रश्न
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | बबनराव यादव-लोणीकर | भाजप | परतूर | 19 |
2 | कैलास गोरंटयाल | काँग्रेस | जालना | 10 |
3 | नारायण कुचे | भाजप | बदनापूर (अ.जा.) | 79 |
4 | राजेश टोपे, मंत्री, जून 2023 पर्यंत | राष्ट्रवादी काँग्रेस, जुलै 2023 पासून शरद पवार गट | घनसावंगी | 26 |
5 | संतोष दानवे | भाजप | भोकरदन | 142 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत जालना जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत अनुदान देण्याबाबत,
- जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा
- शिधावाटप केंद्रावरील धान्याचा काळाबाजार
- खामगाव-जालना रेल्वेमार्गाचे काम सुरु करण्याबाबत
- बदनापूर तालुक्यातील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ वैराग संचलित मतिमंद निवासी विद्यालयातील कर्मचाऱ्यांचे इतर संस्थेत समायोजन करण्याबाबत,
- तसेच अंबड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरावस्थेबाबतचे प्रश्न सभागृहात उपस्थित केले.