14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
धुळे जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या एकूण प्रश्न: 484
धुळे जिल्ह्याशी संबंधीत एकुण प्रश्नसंख्या : 35
धुळे ग्रामीण मतदारसंघांचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी सगळ्यात जास्त (357) प्रश्न सभागृहात उपस्थित केले. तर शिरपूर मतदारसंघांचे भाजपा आमदार काशीराम पावरा यांनी संपूर्ण पाच वर्षाच्या कार्यकाळात केवळ 1 प्रश्न सभागृहात मांडला.
धुळे येथील ट्रॉमा केअर सेंटरचे बांधकाम करण्याबाबत, धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात स्वतंत्र महिला रुग्णालय सुरु करण्याबाबत, महिला सुरक्षा, बालकांचे आरोग्य व शिक्षण क्षेत्रांशी संबंधीत विषयांवर सभागृहात प्रश्न उपस्थित केले.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष आणि मतदारसंघ
क्र. | आमदारांचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | कुणाल पाटील | काँग्रेस | धुळे ग्रामीण | 357 |
2 | फारुख शाह | एआयएमआयएम | धुळे शहर | 19 |
3 | मंजुळा गावीत | अपक्ष | साक्री | 52 |
4 | जयकुमार रावल | भाजप | सिंदखेड | 87 |
5 | काशीराम पावरा | भाजप | शिरपूर | 1 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत धुळे जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- धुळे जिल्ह्या परिषदेतील रिक्त पदे
- धुळे जिल्ह्यातील लळिंग-सडगाव-अजनाळे या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत
- साक्री तालुक्यातील म्हसदी, काळगांव, वसमार, घमनार, दातर्ती, ककाणी, भडगाव (वा.), शेवाळी (मा) या गावातील शेतकऱ्यांना सन २०१८ खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीतील अनुदानाचे वाटप झाले नाही
- धुळे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, पाणी टंचाई, प्रलंबित प्रकल्प, दुग्ध व्यवसाय संबंधित पशुपालकांच्या प्रलंबित मागण्या, पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे, पशुवैद्यकीय दवाखाने वाढवण्याची गरज, बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जीवीत करण्याबाबतचे प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आले.