नंदुरबार जिल्ह्यातील आमदारांचं प्रगतीपुस्तक

Nandurbar : नंदुरबारच्या या आमदारांपैकी एकाही आमदारांनी महिला विषयक एकही प्रश्न उपस्थित केला नाही. तर बालकांसंबंधीत नंदुरबार तसेच मेळघाट या आदिवासी भागात बालमृत्यू व मातामृत्यूचे वाढते प्रमाण, बालकांमधील कुपोषण व अतिस्थुलतेचे वाढते प्रमाण, चुकीच्या संच मान्यतेमुळे शाळाबाहय  होणाऱ्या विद्यार्थांचे वाढते प्रमाण अशा सर्व प्रश्नांचा समावेश आहे.
[gspeech type=button]

14 व्या अधिवेशनातील  एकूण प्रश्न : 5,921

नंदुरबार जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या एकूण : 74

नंदुरबार जिल्ह्याशी संबंधीत प्रश्नसंख्या : 3

 

नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यातुन नवापूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी सर्वाधिक (67) प्रश्न गेल्या पाच वर्षात सभागृहात उपस्थित केले. तर अक्कलकुवा मतदारसंघांचे भाजपा आमदार ॲड. के. सी.पाडवी यांनी एकही प्रश्न सभागृहात विचारला नाही. 

नंदुरबारच्या या आमदारांपैकी एकाही आमदारांनी महिला विषयक एकही प्रश्न उपस्थित केला नाही. तर बालकांसंबंधीत नंदुरबार तसेच मेळघाट या आदिवासी भागात बालमृत्यू व मातामृत्यूचे वाढते प्रमाण, बालकांमधील कुपोषण व अतिस्थुलतेचे वाढते प्रमाण, चुकीच्या संच मान्यतेमुळे शाळाबाहय  होणाऱ्या विद्यार्थांचे वाढते प्रमाण अशा सर्व प्रश्नांचा समावेश आहे.

 

जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांनी विचारलेले प्रश्न :

क्र.

आमदाराचे नाव पक्ष मतदारसंघ प्रश्नसंख्या
1 राजेश पाडवी भाजप शहादा (अ.ज.) 6
2 शिरिषकुमार  नाईक काँग्रेस नवापूर (अ..ज.) 67
3 डॉ. विजयकुमार  गावित भाजप  नंदूरबार (अ.ज.) 1
4 ॲड. के. सी.पाडवी भाजप  अक्कलकुवा (अ.ज.)

0

(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)

 

14 व्या विधानसभेत नंदुरबार जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न – 

  • जिल्हयात शासकीय वापरासाठी असलेला औषधसाठा फेकून दिल्याबाबत
  • नाशिक विभागातील धुळे, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची, जिल्हा परिषदेची व सार्वजनिक बांधकाम विभागाची विविध रस्त्यांची विकासात्मक कामांतील दिरंगाई, या सर्व कामांतील कंत्राटदाराचा गैरकारभार आणि शासनाचे दुर्लक्ष
  •  नंदूरबार जिल्ह्यातील 1104 रस्त्यांच्या कामांमधला घोटाळा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ