14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
नाशिक जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या एकूण : 817
नाशिक जिल्ह्याशी संबंधीत एकूण प्रश्नसंख्या : 194
नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 15 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी इगतपुरी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी सर्वाधिक 254 प्रश्न सभागृहात उपस्थित केले आहेत. तर बागलाण मतदारसंघांचे भाजपा आमदार दिलिप बोरसे यांनी केवळ एक प्रश्न विधीमंडळात विचारला आहे. तर मंत्री दादा भूसे यांनी गेल्या पाच वर्षात विधानसभेत एकही प्रश्न उपस्थित केला नाही.
नाशिक जिल्ह्यासंबंधीत त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आधारश्रमातील चार वर्षीय बालकाचा झालेला मृत्यू, ज्ञानदिप गुरुकुल आधारश्रमात मुलींवर झालेले लैंगिक अत्याचाराच्या घटना सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या.
मालेगांव येथील महापालिकेच्या शाळांमध्ये पुरविला जाणारा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार, नाशिक महानगरपालिकेतील निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविणाऱ्या संस्थांनाच पुन्हा कंत्राट देणे यासारखा प्रशासकीय गैरव्यवहार उघडकीस आणला.
नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बालरुग्णांचा झालेला मृत्यू, जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सकस आहारातील गैरव्यवहार व यासंबंधीत चौकशी अहवाल असूनही दोषी कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई न करणे, जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या वनहक्क दाव्यासह अन्य मागण्यांबाबत तसेच नाशिक मधील आदिवासी वसतीगृहाची दुरावस्था व आदिवासी मुलींच्या बहुमजली वसतीगृहाच्या निकृष्ट दर्जाबाबतचे प्रश्न सभागृहात मांडले गेले.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | छगन भुजबळ,मंत्री, नोव्हें 2019 ते जून2022, जुलै 2023 ते नोव्हें 2024 | राष्ट्रवादी काँ. जून 2023 पासून अजित पवार गट | येवला | 162 |
2 | देवयानी फरांदे | भाजप | नाशिक मध्य | 75 |
3 | दिलीप बोरसे | भाजप | बागलाण (अ.ज.जा.) | 1 |
4 | दिलीप बनकर | राष्ट्रवादी काँ. जुलै 2023 पासून अजित पवार गट | निफाड | 102 |
5 | हिरामण खोसकर | काँग्रेस | इगतपुरी (अ.ज. जा.) | 254 |
6 | ॲड माणिकराव कोकाटे | राष्ट्रवादी काँ. जुलै 2023 पासून अजित पवार गट | सिन्नर | 55 |
7 | मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक | एमआयएम | मालेगाव मध्य | 51 |
8 | नरहरी झिरवाळ, विधानसभा उपाध्यक्ष | राष्ट्रवादी काँ. जुलै 2023 पासून अजित पवार गट | दिंडोरी (अ.ज.जा.) | 8 |
9 | नितीन पवार | राष्ट्रवादी काँ. जुलै 2023 पासून अजित पवार गट | कळवण (अ.ज.जा.) | 90 |
10 | डॉ. राहुल आहेर | भाजप | चांदवड | 16 |
11 | ॲड राहुल ढिकले | भाजप | नाशिक पूर्व | 57 |
12 | सरोज अहिरे | राष्ट्रवादी काँग्रेस, जुलै 2023 पासून शरद पवार गट | देवळाली (अ.जा.) | 123 |
13 | सीमा हिरे | भाजप | नाशिक पश्चिम | 69 |
14 | सुहास कांदे | शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट | नांदगाव | 27 |
15 | दादाजी भुसे (2019 पासून मंत्री. प्रश्न, उपस्थिती लागू नाही) | शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट | मालेगाव बाह्य | 0 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत नाशिक जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील अभ्यासक्रमाबाबत
- जिल्ह्यात जलस्त्रोतांमध्ये रासायनिक घटक आढळून आल्याबाबत
- नाशिक येथील डॉ.डी.एस अहिर शाळेत शालेय पोषण आहाराच्या खिचडीत अळ्या आढळून आल्याबाबत
- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सोमनाथनगर येथल्या जिल्हापरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शिष्यवृत्तीमध्ये झालेला गैरव्यवहार
- गंगापूर येथील रिसॉर्ट चालकांनी पूर्वपरवानगी न घेता मलजल धरणात सोडल्याबाबत
- मालेगाव शहरातील कचऱ्याच्या समस्येने नागरिक त्रस्त असल्याबाबत,
- केंद्र शासनाने नाशिक महानगरपालिकेस दिलेल्या निधीचा योग्य वापर न केल्याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.