भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या डिफेन्स रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डिआरडिओ) यांनी अग्नी या बॅलेस्टीक क्षेपणास्त्राच्या साखळीतील अग्नी 6 हे आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल विकसीत केलं आहे. आत्मनिर्भर भारत या अंतर्गत निर्माण केल्या जाणाऱ्या या संरक्षण सामुग्रीमुळे भारत हा संरक्षण क्षेत्रात आणखीन मजबूत होणार आहे.
अग्नी या प्रकल्पा अंतर्गत निर्माण केलेल्या सर्व क्षेपणास्त्रांची ताकद आणि वैशिष्ट्याची जगभरात चर्चा होत आहे. आत्तापर्यंत अग्नी – 5 आपण लॉन्च केले आहेत. अग्नी – 6 हे मिसाईल यावर्षी डिसेंबर अखेर किंवा 2025 जानेवारी महिन्यामध्ये लॉन्च केलं जाणार आहे. जमिनीवरून किंवा पाणबुडीवरून मिसाईल लॉन्च केली जाईल. अग्नी 6 हे मिसाईल आंतरखंडीय असल्यामुळे अर्ध्या जगापर्यंत या क्षेपणास्त्राच्या साहाय्याने मारा करता येऊ शकतो.
अग्नी 6 क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य
आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल (Intercontinental Missile) अग्नी 6 मध्ये अत्याधुनिक नेविगेशन आणि मार्गदर्शन प्रणाली आहे. अग्नी 6 क्षेपणास्त्राची रेंज जवळपास 6 हजार ते 10 हजार किलोमीटर आहे. या क्षेपणास्त्रामध्ये 10 शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे यामध्ये पारंपारिक आणि आण्विक शस्त्र घेऊन जाता येणे शक्य आहे. या क्षेपणास्त्रामध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी 10 ते 12 आण्विक शस्त्रांचा मारा करण्याची क्षमता विकसीत केली आहे.
DRDO चा पुढचा प्रकल्प
अग्नी 6 या प्रकल्पानंतर आता डिआरडीओ संस्था ही संपूर्ण चीनला क्षेपणास्त्राच्या पल्ल्यात आणू शकेल असं तंत्रज्ञान विकसीत करण्याच्या मार्गावर आहे. तसेच पाणबुडीच्या माध्यमातून आण्विक शस्त्रे असलेलं क्षेपणास्त्र लॉन्च करु शकतो असे (SLBM) मिसाईल विकसीत करत आहे.