14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
बुलढाणा जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 596
बुलढाणा जिल्ह्याशी संबंधीत प्रश्नसंख्या : 131
बुलढाणा जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न हे मलकापूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राजेश पंडितराव एकडे यांनी उपस्थित केले आहेत. तर सर्वात कमी प्रश्न भाजपा आमदार संजय कुटे यांनी विचारले आहेत.
या प्रश्नांमध्ये राज्यातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याबाबत, संग्रामपूर येथील शाळेत निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचं वाटप, शालेय पोषण आहारासाठी स्वयंपाकगृह उपकरणांचा पुरवठा करण्याबाबत, जिल्हा स्त्री रुग्णालयातील गैरकारभार अशा विषयावरील प्रश्न सभागृहात उपस्थित केले आहेत.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
| क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
| 1 | राजेश एकडे | काँग्रेस | मलकापूर | 276 |
| 2 | संजय गायकवाड | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट | बुलढाणा | 124 |
| 3 | श्वेता महाले | भाजप | चिखली | 133 |
| 4 | डॉ. संजय रायमुलकर | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट | मेहेकर | 86 |
| 5 | आकाश फुंडकर | भाजप | खामगाव | 61 |
| 6 | संजय कुटे | भाजप | जळगाव जामोद | 7 |
| 7 | राजेंद्र शिंगणे | राष्टवादी काँग्रेस. जुलै 2023 पासून शरद पवार गट | सिंदखेड राजा | 39 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत बुलढाणा जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- जिल्ह्यात दारिद्रय रेषेखालील नागरिकांसाठी असलेल्या शिधावाटप पत्रिकांचं वितरण बंद केल्याबाबत
- जिल्ह्यातील लोणार सरोवराचे संवर्धन व जतन करण्याबाबत
- नांदुरा शहरात घाणीचे साम्राज्य,
- खामगांव व शेगांव तालुक्यातील कृषीपंप जोडण्या प्रलंबित
- बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा परिसरात अंमली पदार्थांची व ड्रग्जची होत असलेली खुलेआम विक्री
- खामगांव तालुक्यातील जवळपास 2500 आधार कार्ड हे नाशिक येथील रेशन कार्ड धारकांच्या नावाशी लिंक झाल्याने उद्भवलेल्या समस्या
- जिल्ह्यात सफाई कामगारांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे
- उड्डाणपूल, पाणीपुरवठा, कालवे दुरुस्ती, ग्रामीण रुग्णालय यांची गरज,
- पिकांचं नुकसान, अवैध उत्खनन,सरकारी योजनांमधले गैरव्यवहार यासंबंधीत प्रश्न उपस्थित केले.



