14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
वाशिम जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 296
वाशिम जिल्ह्याशी संबंधीत एकूण प्रश्न : 8
वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम मतदारसंघांचे भाजपा आमदार लखन मलिक यांनी गेल्या पाच वर्षात विधानसभेत एकही प्रश्न विचारलेला नाहीये. या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त (239) प्रश्न रिसोड मतदारसंघांचे काँग्रेस आमदार अमित झनक यांनी मांडले आहेत.
या प्रश्नांमध्ये राज्यातील आंगणवाड्यातील पायाभूत सुविधा, निकृष्ठ दर्जाच्या पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांना झालेली विषबाधा, महात्मा जोतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने महत्वाच्या परिक्षांसाठी देण्यात येणारी आर्थिक सहाय्य योजना अद्याप सुरु न केल्याबाबत, राज्यात “लेक लाडकी” या योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | अमित झनक | काँग्रेस | रिसोड | 239 |
2 | राजेंद्र पाटणी | भाजप | कारंजा | 67 |
3 | लखन मलिक | भाजप | वाशिम | 0 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत वाशिम जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- जिल्ह्यात 2011च्या जनगणनेनुसार 25 प्राथमिक आरोग्य केंद्र व 153 उपकेंद्र आहेत. मात्र, वाढत्या लोकसंख्यंनुसार आरोग्य केंद्राची संख्या वाढवणे
- रस्तेदुरुस्ती, पुलाचे बांधकाम, पाणीपुरवठा योजना अशा पायाभूत सोई-सुविधांविषयी प्रश्न
- तसेच रिसोडमध्ये औद्योगिक क्षेत्राची मागणी विषयक प्रश्न सभागृहात उपस्थित केला.