गडचिरोलीतील आमदारांचं सभागृहातलं प्रगतीपुस्तक

Gadchiroli : या विधानसभेत गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी चांगली कामगिरी केली आहे. तेराव्या विधानसभेत गडचिरोली जिल्ह्यातून केवळ 17 प्रश्न विचारले होते. मात्र या विधानसभेत जिल्ह्यातून एकूण 191 प्रश्न विचारले.
[gspeech type=button]

14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921

गडचिरोली जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 191

जिल्ह्याशी संबंधीत एकूण प्रश्नसंख्या : 53

 

या विधानसभेत गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी चांगली कामगिरी केली आहे. तेराव्या विधानसभेत गडचिरोली जिल्ह्यातून केवळ 17 प्रश्न विचारले होते. मात्र या विधानसभेत जिल्ह्यातून एकूण 191 प्रश्न विचारले. यामध्ये सगळ्यात जास्त (84) प्रश्न हे अहेरी मतदारसंघांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धर्मरावबाबा आत्रम यांनी विचारले. भाजपा आमदारा कृष्णा गजबे आणि देवराव होळी यांनी ही अनुक्रमे 60 आणि 63 प्रश्न उपस्थित केले आहेत.  

 

जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या 

क्र.  आमदारांचे नाव 

 

पक्ष  मतदारसंघ  प्रश्नसंख्या 
1 कृष्णा गजबे भाजप आरमोरी   60
2 देवराव होळी  भाजप गडचिरोली 63
3 धर्मरावबाबा आत्राम  राष्ट्रवादी, जुलै 23 पासून अजित पवार गट अहेरी  84

(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)

 

14 व्या विधानसभेत गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –  

  • मौजे पुरसलगोंदी (ता.एटापल्ली) या गावावर नक्षलवाद्यांचा हल्ला
  • जिल्ह्यात पावसाळयात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुरेशा शेडअभावी तांदूळ भिजून झालेले नुकसान
  • चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थानच्या पर्यटन व बाहयवळण रस्त्याच्या कामास लागणारा विलंब, 
  • गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे शेतमाल विक्रीसाठी आधारभूत खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत,  
  • गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन
  • विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्हा मानव विकास निर्देशांकामध्ये मागास असल्याचे दर्शवण्याबाबत
  • कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात विद्युतीकरणाचे काम नव्याने करण्याबाबत 
  • कुरखेडा तालुक्यातील पळसगड येथील पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरु करण्याबाबतचे प्रश्न सभागृहात उपस्थित केले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ