14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
चंद्रपूर जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 1,015
चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधीत एकूण प्रश्नसंख्या : 137
चंद्रपूर जिल्ह्यातून सगळ्यात जास्त (380) प्रश्न हे ब्रह्मपूरी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार विजय वड्डेटीवार यांनी विचारले आहेत. तर सर्वात कमी (73) प्रश्न हे भाजपा आमदारा बंटी भांगडिया यांनी विचारले आहेत.
या प्रश्नामध्ये आरोग्यविषयक प्रश्न सर्वाधिक आहेत. यासोबतच चंद्रपूर जिल्हयात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील व चंद्रपूर जिल्ह्यातील गरोदर महिला व बालकांना निकृष्ट व भेसळयुक्त पोषण आहाराचा पुरवठा केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | सुभाष धोटे | काँग्रेस | राजुरा | 333 |
2 | सुधीर मुनगंटीवार, मंत्री, जून 2022 पासून | भाजप | बल्लारपूर | 205 |
3 | बंटी भांगडिया | भाजप | चिमूर | 73 |
4 | किशोर जोरगेवार | अपक्ष | चंद्रपूर | 117 |
5 | प्रतिभा धानोरकर (मे 2024 पर्यंत आमदारपदी) | काँग्रेस | वरोरा | 316 |
6 | विजय वडेट्टीवार, मंत्री, जून 2022 पर्यंत | काँग्रेस | ब्रम्हपुरी | 380 |
एकूण | 1,424 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- जिल्ह्यातील अवैध उत्खनन, अवैध वाळू उपसा आणि अवैध व बनावट दारू,
- चंद्रपूर-मूल हा भ्रमणमार्ग वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत असल्याबाबत
- सरकारकडून विविध कामांसाठी संपादित शेतजमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना देण्याबाबत
- चंद्रपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाकरीता निधी उपलब्ध करून देण्याबाबत
- वरोरा येथे पंतप्रधान आवास योजनेमध्ये झालेला गैरव्यवहार,
- चंद्रपूर शहरातील प्रदुषणात वाढ झाल्याबाबत
- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रदूषणामुळे मृत्युच्या संख्येत झालेली वाढ
- चंद्रपूर जिल्हयातील रेशन दुकानांना शासकीय धान्य पोहोचविण्याचे कंत्राट दिलेली कंपनी अनियमितता करीत असल्याबाबत
- चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन विभागातील आदिवासी समाजावर होत असलेल्या अत्याचाराबाबत विदर्भातील गडचिरोली
- चंद्रपूर व गोंदिया जिल्हा मानव विकास निर्देशांकामध्ये मागास असल्याबाबत इत्यादी विषय मांडले आहेत.