गोंदिया जिल्ह्यातील आमदारांचे सभागृहातील प्रगतीपुस्तक

Gondiya : तेराव्या विधानसभेत गोदिंया जिल्ह्यातून  महिला विषयक एकही प्रश्न विचारला नव्हता. मात्र, या चौदाव्या विधानसभेत गोंदिया जिल्ह्यातून पाच प्रश्न विचारले गेले आहेत. शालेय शिक्षण आणि बालकांविषयीसुद्धा तेराव्या विधानसभेच्या  तुलनेने या विधानसभेत अधिक प्रश्न विचारले आहेत. 
[gspeech type=button]

14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921

गोंदिया जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 139

गोंदिया जिल्ह्याशी संबंधीत प्रश्नसंख्या : 22

गोंदिया जिल्ह्यातून सर्वात जास्त प्रश्न (85) अर्जुनी मोरगाव मतदारसंघांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी विचारले आहेत. तर सर्वात कमी (12) प्रश्न हे तिरोरा मतदारसंघाचे भाजपा आमदार विजय रहांगडाले यांनी विचारले आहेत. 

तेराव्या विधानसभेत गोदिंया जिल्ह्यातून  महिला विषयक एकही प्रश्न विचारला नव्हता. मात्र, या चौदाव्या विधानसभेत गोंदिया जिल्ह्यातून पाच प्रश्न विचारले गेले आहेत. 

शालेय शिक्षण आणि बालकांविषयीसुद्धा तेराव्या विधानसभेच्या  तुलनेने या विधानसभेत अधिक प्रश्न विचारले आहेत. 

 

जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या

क्र.

आमदाराचे नाव पक्ष मतदारसंघ

प्रश्नसंख्या

1

मनोहर चंद्रिकापुरे राष्ट्रवादी काँग्रेस – जुलै 2023 पासून अजित पवार गटासोबत अर्जुनी मोरगाव 85
2 सहासराम कोरोटे काँग्रेस आमगाव 22
3 विजय रहांगडाले भाजप तिरोरा 12
4 विनोद अगरवाल अपक्ष गोंदिया 37
एकूण 153

(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)

 

14 व्या विधानसभेत गोंदिया जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –  

  • गोंदिया आणि भंडारा जिल्हयातील शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाला केलेल्या धानविक्रीची रक्कम देण्याबाबत
  • गोंदिया जिल्हयात धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मंजूरी देऊनही अनेक केंद्र बंद असल्याबाबत
  • विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्हा मानव विकास निर्देशांकामध्ये मागास असल्याबाबत
  • आमगांव (जि.गोंदिया) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धानाच्या पुंजणाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याबाबत
  • गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये सोयी-सुविधांचा अभाव
  • गोंदिया जिल्ह्यात आदिवासी क्षेत्रातील गर्भवती व प्रसूती होणाऱ्या महिलांसाठी सुरु केलेली माहेरघर योजना बंद असल्याबाबत
  • गोंदिया जिल्हयातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ