14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
भंडारा जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 553
भंडारा जिल्ह्याशी संबंधित प्रश्न : 33
चौदाव्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा विरोधी पक्षनेते व साकोलीचे आमदार नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातून सर्वाधिक 471 प्रश्न उपस्थित केले.
यामध्ये राज्यात बालकांवरील वाढते अत्याचार, भंडाऱ्यातील महर्षी विद्या मंदिर शाळेतील गैरव्यवस्थापन, राज्यातील सर्व मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याबाबतचे प्रश्न उपस्थित केलेले.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | राजू कारेमोरे | राष्ट्रवादी काँग्रेस, जुलै 2023 पासून अजित पवार गट | तुमसर | 33 |
2 | नरेंद्र भोंडेकर | अपक्ष | भंडारा | 72 |
3 | नानाभाऊ पटोले | काँग्रेस | साकोली | 471 |
टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.
14 व्या विधानसभेत भंडारा जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात वाळू खरेदी जास्त दराने करावी लागत असल्याने घरकुल लाभार्थी अडचणीत असल्या संदर्भात
- अवैध वाळू तस्करी व बेकायदेशीर रेती उत्खनन
- जिल्हा सहकारी दूध संघावरील आर्थिक संकट
- धान खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याबाबत
- मौजे सालेबर्डी (पांधी), ता. भंडारा येथील प्रकल्पग्रस्तांना घराचा व प्लॉटचा मोबदला मिळण्याबाबत,
- भंडारा व पवनी तालुक्यातील अंशतः बाधित 34 गावातील नागरिकांचं पुनर्वसन
- जिल्हयातील शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांमध्ये झालेला गैरव्यवहार