14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न – 5,921
पुणे जिल्ह्याच्या आमदारांची एकूण प्रश्नसंख्या – 1456
पुणे जिल्ह्याशी संबंधित प्रश्न – 355
मतदारसंघांची संख्या विचारात घेता पुणे हा राज्यातला मुंबई उपनगर जिल्ह्याखालोखालचा, दुसरा मोठा जिल्हा आहे. इथल्या एकूण 23 पैकी 2 मतदारसंघांचं प्रतिनिधित्व महिला आमदार करतात. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न पुरंदर मतदारसंघातून काँग्रेस आमदार संजय जगताप यांनी उपस्थित केले. त्यांनी 356 प्रश्न विचारले आहेत. यामध्ये त्यांच्या मतदारसंघ आणि जिल्ह्यासोबतच पूर्ण राज्याशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
---|---|---|---|---|
1 | अजित पवार (मंत्री – 2019 ते 2022. उपमुख्यमंत्री – 2023 पासून) | राष्ट्रवादी कॉं | बारामती | 160 |
2 | अण्णा बनसोडे | राष्ट्रवादी कॉं. जुलै 2023 पासून अजित पवार गट | पिंपरी (अ.जा.) | 12 |
3 | अशोक पवार | राष्ट्रवादी कॉं. जुलै 2023 पासून शरद पवार गट | शिरूर | 203 |
4 | अतुल बेनके | राष्ट्रवादी कॉं. जुलै 2023 पासून अजित पवार गट | जुन्नर | 80 |
5 | भीमराव तापकीर | भाजप | खडकवासला | 95 |
6 | चंद्रकांत (दादा) पाटील | भाजप | कोथरुड | 253 |
7 | चेतन तुपे | राष्ट्रवादी कॉं, जुलै 2023 पासून शरद पवार गट | हडपसर | 262 |
8 | दत्तात्रय भरणे | राष्ट्रवादी कॉं, जुलै 2023 पासून अजित पवार गट | इंदापूर | 94 |
9 | दिलीप मोहिते-पाटील | राष्ट्रवादी कॉंग्रेस, जुलै 2023 पासून अजित पवार गट | खेड-आळंदी | 111 |
10 | दिलीप वळसे-पाटील | राष्ट्रवादी कॉंग्रेस. जुलै 2023 पासून अजित पवार गट | आंबेगाव | 123 |
11 | लक्ष्मण जगताप (3 जानेवारी 2023 रोजी निधन) | भाजप | चिंचवड | 83 |
12 | अश्विनी जगताप (मार्च 2023 पासून) | भाजप | चिंचवड | 52 |
13 | माधुरी मिसाळ | भारतीय जनता पक्ष | पर्वती | 174 |
14 | महेश (दादा) किसन लांडगे | भारतीय जनता पक्ष | भोसरी | 26 |
15 | मुक्ता शैलेश टिळक (22 डिसेंबर 2022 रोजी निधन)
रविंद्र हेमराज धंगेकर (मार्च 2023 पासून) |
भारतीय जनता पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
कसबा पेठ
कसबा पेठ |
5
83 |
16 | राहुल कुल | भारतीय जनता पक्ष | दौंड | 186 |
17 | संग्राम थोपटे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | भोर | 243 |
18 | संजय जगताप | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | पुरंदर | 356 |
19 | सिद्धार्थ शिरोळे | भारतीय जनता पक्ष | शिवाजीनगर | 67 |
20 | सुनील कांबळे | भारतीय जनता पक्ष | पुणे कँटोनमेंट (अ.जा.) | 115 |
21 | सुनील शेळके | राष्ट्रवादी कॉंग्रेस. जुलै 2023 पासून अजित पवार गट | मावळ | 104 |
22 | सुनील टिंगरे | राष्ट्रवादी कॉंग्रेस. जुलै 2023 पासून अजित पवार गट | वडगाव शेरी | 97 |
टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.
14 व्या विधानसभेत पुणे जिल्ह्याशी संबंधित उपस्थित प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- मध्यवर्ती पुण्यातील विविध पेठांमधील सुमारे अडीच हजार जुन्या वाड्यांच्या पुनर्विकास
- पुणे जिल्ह्यातील दरड कोसळून भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांचे पुनर्वसन करण्याबाबत
- जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांकडून आदिवासी विकास महामंडळाने हिरडा खरेदी बंद केल्याबाबत
- पुणे शहरातील ससून रुग्णालयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिले जात असल्याबाबत
- भुगाव, भुकुम व पिरंगुट (ता. मुळशी) येथील नळपाणी पुरवठा योजनेस मंजुरी देण्याबाबत
- पुणे स्वारगेट आगारातील एसटी महामंडळाच्या नाथजल उपक्रमातर्गत झालेला गैरव्यवहार
- भोर, वेल्हा व मुळशी तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव समाजाच्या जात पडताळणीच्या समस्यांबाबत
- पुणे जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट कार्यरत असल्याबाबत
- पिंपरी-चिंचवड (जि.पुणे) शहरातील हिंजवडी-चाकण व पिंपरी-निगडी मेट्रो मार्गांच्या मंजुरीबाबत
- वाघोली (जि. पुणे) येथील ‘सोलासिया’ सोसायटीच्या मलनिःसारण टाकीत पडून कामगारांचा झालेला मृत्यू
- राज्यातील तुकडेबंदी व ग्रामपंचायत हद्दीतील सदनिकांची तसेच पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील गृहप्रकल्पांची दस्त नोंदणी बंद केल्याबाबत
- निमगाव खंडोबा (ता. खेड) येथील चासकमान धरणाचा डावा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याबाबत
- भामा आसखेड (ता.खेड, जि. पुणे) धरण प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला देऊन प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबत
- भांबुर्डा व पुणे वनपरिक्षेत्रातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत
- खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी व आळंदी परिसरात बेकायदेशीर प्लॉट विक्री करून शासनाचा महसूल बुडवल्याबाबत
- हवेली तालुक्याचा वाढता विस्तार, नागरीकरण आणि त्या तुलनेत तोकडी प्रशासकीय यंत्रणा पाहता हवेली तहसील कार्यालयाचे विभाजन करून हवेलीसाठी स्वतंत्र नवीन तहसील कार्यालय स्थापन करण्याबाबत
- पुणे शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लावल्यामुळे कचऱ्यातील घाण, द्रव जमिनीत झिरपून प्रदूषित होणारे जलस्रोत आणि त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी तसेच कचऱ्याने होणारे हवेतील प्रदूषण याबाबत
- खडकवासला येथे मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्ये झालेली लक्षणीय वाढ
- भिगवण येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्व तांत्रिक सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करून औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्याबाबत.