Beauty DIY करा, पण जरा जपून

Beauty DIY : DIY म्हणजेच Do It Yourself. तुमचं तुम्हीच करा. DIY ब्युटी ट्रीटमेंट्समध्ये नैसर्गिक घटकांचा वापर करून सौंदर्याची काळजी घेता येते. याचे फायदे म्हणजे स्वस्त, सुरक्षित, आणि त्वचेला योग्य घटकांचा वापर. मात्र, याचे काही तोटे म्हणजे परिणामांमध्ये लागणारा वेळ, घटकांच्या प्रतिकूल प्रतिक्रिया, आणि साठवणुकीची समस्या. DIY उपचार करताना योग्य काळजी घेतल्यास हे उपचार आपल्या त्वचेचं आणि केसांचं आरोग्य राखण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. 
[gspeech type=button]

परवा एका रील मध्ये बघितलं, ‘Aloevera gel मध्ये मध आणि हळद मिक्स करून लावलं की स्किन hydrate होते’ हे असे ट्युटोरिअल्स मला वाटतं प्रत्येक घरात वापरत असतात. प्रत्येक मिडिया ऍप वर ह्याचा रतीब चालूच असतो.  

कधी किचनसंबंधी जेवण, स्वच्छता, स्टोरेज तर कधी आरोग्य. Well Being, ब्युटी आणि मेकअप ह्यांचा तर सुकाळ आहे. आला दिवस शे पाचशे रील्स व्हिडीओ शॉर्ट्स ह्या विषयांना समर्पित असतात. कुठे कोणी केसांना कसं हेल्दी बनवायचं, तर कुठे केस कसे आपले आपण कापायचे. मेकअपची तर बातच नाय. म्हणजे आज प्रत्येकजण मेकअप आर्टिस्ट बनलाय सोशल मीडियावर. 

Do It Yourself

तर हे DIY म्हणजेच Do It Yourself. तुमचं तुम्हीच करा. DIY ब्युटी ट्रीटमेंट्समध्ये नैसर्गिक घटकांचा वापर करून सौंदर्याची काळजी घेता येते. याचे फायदे म्हणजे स्वस्त, सुरक्षित, आणि त्वचेला योग्य घटकांचा वापर. मात्र, याचे काही तोटे म्हणजे परिणामांमध्ये लागणारा वेळ, घटकांच्या प्रतिकूल प्रतिक्रिया, आणि साठवणुकीची समस्या. DIY उपचार करताना योग्य काळजी घेतल्यास हे उपचार आपल्या त्वचेचं आणि केसांचं आरोग्य राखण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात

सगळ्याच वस्तू सर्वांना चालतील असं नाही

तसं पाहिलं तर आजीबाईंचा बटवा ह्याच उगमस्थान म्हणायला हरकत नाही. प्रत्येक आजार, त्रासावर तिच्या बटव्यात काहीतरी उपाय होता. पण त्या उपायाला आयुर्वेदाचा आणि अनुभवाचा बेस आहे. वर्षानुवर्ष वापरुन सिद्ध केलेले फॉर्म्युले आहेत. आता हेच आमच्या कोरफडीचा चीक aloevera gel लावणं बघा. ह्या कोरफडीच्या अनेक जाती आहेत. त्यातली आपण घरात कोणती लावली आहे ते कसं समजावं?? आणि मध जेवढा hydrating आहे तेवढाच oily skin ला त्रास देऊ शकतो.अनेक जणांच्या त्वचेची हळद किंवा चंदनाने आग होते ( allergy असू शकते) पण हे ‘Beauty Enthusiasts’ दाखवत असतात. त्यांचं कामच आहे ते. पण आपण ते वापरताना ‘सोच समझ के’ वापरायला हवं.  

घरात ब्युटी ट्रीटमेंट करता येईल

चला तर, आज आपण बोलूयात या DIY ब्युटी ट्रीटमेंट्सच्या फायद्या-तोट्यांबद्दल. DIY (Do It Yourself) ब्युटी ट्रीटमेंट्स म्हणजे घरच्या घरी, स्वस्त आणि सहज उपलब्ध घटकांचा वापर करून केलेले सौंदर्य उपचार. यामध्ये घरात तयार केलेल्या फेस मास्क, हेअर मास्क, स्क्रब्स, आणि इतर ब्युटी प्रोडक्ट्सचा समावेश होतो. 

DIY ब्युटी ट्रीटमेंट्सचे फायदे: 

  1. नैसर्गिक घटकांचा वापर: DIY ट्रीटमेंट्समध्ये रासायनिक घटक नसल्याने ते नैसर्गिक असतात. हे उपचार त्वचेला कमी नुकसान करतात असे मानले जाते. 
  2. स्वस्त आणि सहज उपलब्ध: घरातील सामग्री वापरल्यामुळे हे उपचार स्वस्त पडतात. बाजारातल्या महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सपेक्षा घरातील उपलब्ध घटकांमुळे खर्च कमी होतो. 
  3. कस्टमायझेशनची मुभा: आपण आपल्या त्वचेच्या किंवा केसांच्या प्रकारानुसार DIY ट्रीटमेंट्स बनवू शकतो. जसे, तेलकट त्वचेसाठी बेसन आणि लिंबू, तर कोरड्या त्वचेसाठी मध आणि दूध. 
  4. केमिकल फ्री उपचार: बाजारातील उत्पादने अनेक वेळा रासायनिक असतात आणि त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. परंतु DIY ट्रीटमेंट्स नैसर्गिक असल्याने या त्रासापासून बचाव होतो. 

लक्षात ठेवा –

  1. नैसर्गिक म्हणजेच पूर्ण सुरक्षित नाही – प्रत्येकाची त्वचा आणि केसांची प्रकार वेगवेगळे असतात. काही घटक एकासाठी चांगले असले तरी दुसऱ्यासाठी ते हानिकारक ठरू शकतात. 
  2. पॅच टेस्ट न करणे – आपण कोणताही नवीन घटक वापरताना त्वचेवर पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे. परंतु Beauty Enthusiasts च्या influenceने बरेच जण हा मुद्दा लक्षात घेतच नाही आणि बरेच वेळा त्वचेवर एलर्जी, लालसरपणा आणि जळजळ होऊ शकते. 
  3. घटकांचा अतिरेकी वापर –  काही वेळा लोक जास्त प्रभावासाठी घटकांचा अतिरेकी वापर करतात. जसे, लिंबाच्या अ‍ॅसिडचा जास्त प्रमाणात वापर त्वचेला नुकसान करू शकतो, तर अंड्याचा जास्त वापर केसांचे नुकसान करु शकतो. 
  4. प्रोफेशनल मार्गदर्शनाचा अभाव – ब्युटी सलोनमध्ये केलेले उपचार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली असतात. परंतु DIY उपचारांमध्ये तसा अनुभव नसतो. म्हणून कधी कधी योग्य ज्ञानाच्या अभावी चुकाही होऊ शकतात. 

जास्त प्रयोग टाळा 

DIY ब्युटी ट्रीटमेंट्स म्हणजे थोडं धैर्य, थोडी खेळण्याची वृत्ती आणि जरा हटके प्रयोग. फायदे खूप आहेत पण थोडं सांभाळूनच. कारण सगळं नैसर्गिक म्हटलं की, उत्तम होईल असं नाही. थोडं तपासून, थोडं अनुभवून, आणि थोडं सावधपणे वापरा. शेवटी, आपल्या घरच्या पदार्थांनी आणि आपल्याच कल्पनांनी आपलं सौंदर्य जपायला खूपमजा येते! तर DIY उपचारांचा आनंद घ्या, पण उगाचच प्रयोग करता योग्य मार्गाने करा. जो उपचार तुम्हाला योग्य वाटतो तोच फक्त वापरा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ