जम्मू-काश्मीरमध्ये 40 जागांसाठी आज मतदानाचा शेवटचा टप्पा, 8 ऑक्टोबरला जाहीर होणार निकाल

Jammu- Kashmir:  जम्मू – काश्मीरमध्ये आज तिसऱ्या टप्प्यांतील मतदान सुरू आहे. आज 40 विधानसभा मतदारसंघातील तब्बल 400 उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. 
[gspeech type=button]

जम्मू – काश्मीरमध्ये आज तिसऱ्या टप्प्यांतील मतदान सुरू आहे. या टप्प्यात एकूण सात जिल्ह्यातील 40 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये जम्मूमधील 24 आणि काश्मीरमधील 16 मतदारसंघांचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे 40 विधानसभा जागांसाठी तब्बल 400 उमेदवार रिंगणात आहेत. तर जवळपास 3.9 दशलक्ष नागरिक या टप्प्यात मतदान करणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील महत्त्वाचे मतदारसंघ

आज मतदान होणारे सर्वच जिल्हे तसे महत्त्वाचे आहेत. जम्मूमधल्या जम्मू, उदामपूर, सांबा आणि कठुआ आणि काश्मीरमधल्या बारामुल्ला, बांडीपोरा आणि कुपवारा या जिल्ह्यात मतदान होत आहे. या निवडणुकीत जम्मू जिल्ह्यातून 109 तर  बारामुल्ला जिल्ह्यातून 101 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर कुपवारामध्ये 59, बांडीपोरामध्ये 42, उदामपूर 37, कठूआ 35 आणि सांबामध्ये 32 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जम्मूमध्ये 24 जागांवर भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढती आहेत. काश्मीरमध्ये 16 जागांवर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीची जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स आणि अवामी इतिहात पार्टी आघाडीसोबत मुख्य लढती आहेत.

मतदानाची टक्केवारी

आजच्या तिसऱ्या टप्प्यांत सकाळी 11 वाजेपर्यंत 28.12 टक्के मतदान झालं आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यात 11.60 टक्के मतदान झालेलं. यापैकी उदामपूरमध्ये 14.23  सर सांबा जिल्ह्यात 13.31 टक्के मतदान झालेलं. बांडीपोरा, जम्मू, कठूआ, कुपवारा अशा सगळ्याच जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 10 टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे.

पहिल्या दोन टप्प्यांतही मोठ्या प्रमाणावर मतदान

जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 24 जागांसाठी एकूण 61 टक्के मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात 26 जागांसाठी 56 टक्के मतदान झालं.

निवडणूक आयोगाचे विविध उपक्रम

निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावं, यासाठी निवडणूक आयोगानेही विविध जाहिराती आणि उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. मतदारांना मतदान करताना अडचणी येऊ नयेत यासाठी विविध मार्गदर्शक सूचनांसह आवश्यक तिथे विशेष मतदान केंद्र उभे केले आहेत. हंडवारा जिल्ह्यातील खंबाला इथं महिलांसाठी विशेष पिंक मतदान केंद्र उभं केलं आहे. काश्मीरमध्ये स्थलांतरीत काश्मीरवासियांसाठी सुद्धा विशेष मतदान केंद्र उभं केलं आहे. तर बांडीपोरा मधल्या डावर येथल्या मतदान केंद्रावर मतदारांकडून मतदान केल्यावर वृक्षरोपण करून घेतलं जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ