बैलगाडी शर्यतीसाठी कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी खरेदी केली 36 लाखाची बैलजोडी

Source : Marathi News
Bullock Cart Race : कर्नाटकमधल्या एका शेतकऱ्यांने बैलगाडी शर्यतीसाठी तब्बल 36 लाखांची बैलाची एक जोडी खरेदी केली आहे.
[gspeech type=button]

कोणाला कोणता छंद असेल आणि तो किती व कशाप्रकारे जपण्याची आवड असेल याविषयी कोणी काही सांगू शकत नाही. हिंदीमध्ये एक शायरी आहे,  “शौक बडी चीज हे साहब,  इसमे कोई हद से गुजरता हैं, तो कोई बेहद गुजरता हैं…” आणि असंच काहीसं घडलंय कर्नाटकमध्ये.  कर्नाटकमधल्या एका शेतकऱ्यांने बैलगाडी शर्यतीसाठी तब्बल 36 लाखांची बैलाची एक जोडी खरेदी केली आहे.

36 लाखाच्या बैलजोडीचा धनी कोण?

कर्नाटकमध्ये सणावरांच्या काळात बैलगाडी शर्यत आयोजीत करतात. खेडेगावात आणि निमशहरी भागात या शर्यतीला खूप महत्त्व आहे. लोकं मोठ्या उत्साहाने या शर्यतीसाठी आवश्यक असलेल्या चांगल्या बैलांची खरेदी करत, या शर्यतीत मोठ्या संख्येने भाग घेतात.

याच शर्यतीची तयारी करण्यासाठी कर्नाटकातल्या महालिंगपूर नगरपरिषदेचे अध्यक्ष यल्लंगौडा पाटील यांनी तब्बल 36 लाखाच्या बैलाच्या जोडीची खरेदी केली आहे. आजूबाजूच्या परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे. साधारणत: दसऱ्याच्या दरम्यान शर्यतीचं आयोजन केलं जातं. तेव्हाच शर्यतीत भाग घेणारे नवीन बैलजोडीची खरेदी करतात. मात्र, यल्लंगौडा पाटील यांनी आताच बैलजोडीची खरेदी करत शर्यतीच्या तयारीला सुरूवात केली आहे.

बैलजोडीची किंमत 10 – 15 लाख

साधारणत: 10 – 15 लाखाला बैलजोड्या विकल्या जातात. मात्र, पाटील यांनी खरेदी केलेल्या बैलजोडीची किंमत ही दुपटीपेक्षाही अधिक आहे. मुळात शर्यतीसाठी चांगल्या दमदार, चपळ बैलजोडीची गरज असते. पाटील यांनी खरेदी केलेल्या बैलजोडीने आजपर्यंत दहा शर्यती जिंकल्या आहेत. या बैलजोडीचा आधीचा मालक या जोडीला विकत असल्याचं कळल्यावर, पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत ही जोडी विकत घेण्याचे ठरवले.

यल्लगौडा पाटील यांच्या कुटुंबांचे बैल दरवर्षी शर्यतीत भाग घेतात. यंदा त्यांना दसऱ्याच्या वेळी मुधोळ येथे होणाऱ्या बैल शर्यतीत भाग घ्यायचा आहे. म्हणून या कुटूंबियांनी नवी बैलजोडी खरेदी करून शर्यतीची तयारी सुरू केली आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक जास्त किंमतीने खरेदी केलेली ही बैलजोडी असल्याचं ही पाटील यांनी सांगितलं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ