मुंबई : शॉपिंग स्पेशल

मुंबईत (Mumbai) तुम्हांला खिशाला परवडणारं बजेट शॉपिंग (shopping) आणि अतिशय महागडं अशा दोन्ही प्रकारचं शॉपिंग करायला खूप ठिकाणं आहेत. कपडे, चपला, बॅगा या सगळ्याच बाबतीत मुंबई ट्रेण्ड सेंटर आहे. पाहुयात मुंबईत कुठं काय चांगलं आणि बजेटमध्ये मिळेल. 
[gspeech type=button]

मुंबईत तुम्हांला खिशाला परवडणारं बजेट शॉपिंग आणि अतिशय महागडं अशा दोन्ही प्रकारचं शॉपिंग करायला खूप ठिकाणं आहेत. कपडे, चपला, बॅगा या सगळ्याच बाबतीत मुंबई ट्रेण्ड सेंटर आहे. पाहुयात मुंबईत कुठं काय चांगलं आणि बजेटमध्ये मिळेल. 

चामड्याचे मार्केट, धारावी

सायन स्थानकातून पूर्वेला बाहेर पडल्यावर समोरच चामड्यांच्या दुकानांची रांग लागलेली पाहायला मिळते. इथं चामड्याच्या बॅग्स, शूज, जॅकेट्स खूपच स्वस्त दरात मिळतात. तुमच्या बजेटमध्ये इथं तुम्हाला चामड्याच्या वस्तू मिळू शकतील. 

लॅमिंग्टन रोड, ग्रँट रोड

इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्स खरेदी करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. इथं लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही अशी अनेक उपकरणं खूपच कमी दरानं मिळतात. ट्रान्झिस्टर, कॅपेसिटर, केबल्स, साउंड कार्ड यांसारखे जुने इलेक्ट्रॉनिक सुटे भागही या बाजारात मिळतात.

लोखंडवाला मार्केट, अंधेरी, मुंबई

लोखंडवाला मार्केट, अंधेरी

कोणती फॅशन सध्या सुरू आहे याकरता लोखंडवाला मार्केटला जायलाच हवं . फॅशनेबल कपडे,अक्सेसरीज, घरासाठी सजावटीच्या वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्तू तुम्हाला इथं बजेटनुसार खरेदी करता येतील. तसेच डिझायनर कपडे किंवा लक्झरी वस्तू देखील या ठिकाणी मिळतात.

 

हिरा पन्ना मार्केट, ताडदेव

मुंबईतील हाजी अली इथलं हिरा पन्ना शॉपिंग सेंटर हे ब्रँडेड वस्तू स्वस्तात मिळण्याचे ठिकाण म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी लक्झरी घड्याळ्यांच्या रिप्लिका, चप्पल, उपकरणं आणि मेकअपचे  सामान  मिळतं.

बांगड्यासाठी प्रसिद्ध असलेले भुलेश्वर मार्केट

सी.पी. टँक,बागड्यांचे मार्केट भूलेश्वर

मंगलदास मार्केटपासून जवळच सी.पी. टँक इथं बांगड्यांची  बाजारपेठ आहे. साडी किंवा वेस्टर्न कपड्यांसोबत वापरता येतील अश्या बांगड्या तुम्हांला इथं मिळतील. प्लास्टिक, काच, तांबा, पीतळ, लोह आणि मिश्र धातूंपासून बांगड्या बनवणाऱ्यांची दुकानं इथं आहेत. त्यामुळं सर्व प्रकारच्या बांगड्या तुम्हाला इथं आरामात मिळू शकतात.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Shopping: डिसेंबर महिना म्हंटल की ख्रिसमस फेस्टिव्हल आलाच. यावेळी आपल्या घराची सजावट करण्यासाठी आपण बाजारात विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू शोधू
Pune Shopping : पुणे शहरातील विविध बाजारपेठांमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या वस्तू, कपडे, फर्निचर, पुस्तके आणि बरेच काही मिळेल. चला तर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ