गुरूवंदना!

दीपाली देशपांडे आणि सुमा शिरूर
शिक्षिका कुठल्याही क्षेत्रातल्या असल्या तरी त्या तन-मनाने आपल्या शिष्यांसाठी झटत असतात. आज शिक्षक दिनानिमित्त दीपाली देशपांडे आणि सुमा शिरुर या श्रेष्ठ शिक्षिकांना वंदन. नेमबाज दीपाली देशपांडे आणि सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे अनेक ऑलिम्पियन नेमबाज घडले.
[gspeech type=button]

आज शिक्षक दिनानिमित्त दीपाली देशपांडे आणि सुमा शिरुर या श्रेष्ठ शिक्षिकांना वंदन.
नेमबाज दीपाली देशपांडे आणि सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे अनेक ऑलिम्पियन नेमबाज घडले.

दीपाली देशपांडे स्वतः 2004 च्या आशियाई स्पर्धेत रायफल शूटिंगमध्ये रजत पदक विजेत्या आहेत. आज त्या स्वप्निल कुसळेच्या कोच म्हणून ओळखल्या जातात. 72 वर्षांनी स्वप्निलच्या रूपाने आपल्याला ऑलिम्पिकमधलं वैयक्तिक पदक प्राप्त झालं. स्वप्निलला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालं म्हणून स्वप्निलचं कौतुक अर्थातच आहे. पण दीपाली देशपांडेंनी त्याच्यासह सहा भारतीय नेमबाज घडवलेत. जे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भारताचं नाव बुलंद करत आहेत. गेली बारा वर्षे दीपाली देशपांडे नॅशनल रायफल असोसिएशन्सच्या माध्यमातून अतिशय लहान वयातच टॅलेंट हेरून त्यांना घडवण्याचं काम करत आहेत. त्यांच्या या तपाला यंदा पदकाच्या रूपाने यश प्राप्त झालं आहे.

गुरू दीपाली देशपांडे व शिष्य स्वप्नील कुसळे

सुमा शिरुर 10 मीटर एअर रायफल प्रकारातील नेमबाज आहेत आणि या प्रकारात त्यांच्या नावे संयुक्त वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 2004 च्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरीत 400 गुणांचा वेध घेत त्यांनी हा रेकॉर्ड नोंदवला होता. 2003 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पॅरा नेमबाजांनाही त्या प्रशिक्षण देतात.

गुरू सुमा शिरूर आणि शिष्य अवनी लेखारा

पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीतील सलग दोन वर्ष सुवर्ण पदक मिळवणारी अवनी लेखारा ही सुमा शिरुर यांची शिष्या आहे. शिरुर यांना द्रोणाचार्य पुरस्कारानेही गौरविले गेले आहे. त्यांनी 2002 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल सांघिक गटाचे सुवर्ण व एकेरीत रौप्यपदक जिंकले आहे. 2010 मध्ये त्यांनी कांस्यपदकाची कमाई केली. याशिवाय आशियाई स्पर्धेत 2002 मध्ये रौप्य व 2006 मध्ये कांस्यपदक त्यांच्या नावावर आहे.

या दोन्ही कोच अर्थात शिक्षिकांची कारकीर्द महाराष्ट्रात घडलेली आहे. आणि त्या आता नवी पिढी तयार करत आहेत. शिक्षिका कुठल्याही क्षेत्रातल्या असल्या तरी त्या तन-मनाने आपल्या शिष्यांसाठी झटत असतात.

क्रीडा हा शब्द मराठीत काहीवेळा क्रिडा असा ऱ्हस्व लिहिला जातो. बहुधा क्रीडाविषयक आपल्या ऱ्हस्वदृष्टीचे ते निदर्शक असावे. मात्र, आता परिस्थिती झपाट्याने बदलतेय. क्रिकेट व्यतिरिक्त इतर अनेक क्रीडा प्रकारांकडे आता आपण आस्थेने बघू लागलो आहोत. जागतिक पातळीवर भारताची मान उंचावणारे खेळाडू तयार करणाऱ्या शिक्षिकांचे महत्त्वही आपल्याला कळत आहे. म्हणूनच आजच्या शिक्षक दिनी महाराष्ट्राच्या श्रेष्ठ शिक्षिका म्हणून दीपाली देशपांडे व सुमा शिरुर यांचा गौरव करणं महत्त्वाचं ठरतं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

संघ परिवारातील विविध संघटनांतील लोकांची वक्तव्ये आता अंतर्विरोध दाखवू लागली आहेत. संरसंघचालक मोहन भागवत तर अतिवाद सोडून संयमित धर्माचरणाकडे निर्देश
Onion market: नाशिकचे ज्येष्ठ नेते सध्या नाकाने कांदे सोलतायत. राज्यातील सन्माननीय ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपदाच्या मानापमान नाट्यात ‘दिल की
महाराष्ट्र विधिमंडळातले सर्वात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना 77 व्या वर्षी पुन्हा समतेचा सूर सापडलाय का? आव्हानात्मक काळात सारेच भुजबळांची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ