HarayanaElections | हरियाणा विधानसभा निवडणुका च्या तारखा बदलल्या, 5 ऑक्टोबर रोजी होणार मतदान

आता हरियाणामध्ये सर्व जागांसाठी1ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
[gspeech type=button]

हरियाणा निवडणूकीच्या तारखांमध्ये बदल

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने  (Election Commission) ही घोषणा केली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) हरियाणातही विधानसभा निवडणुका (Harayana Assembly Elections) होणार आहेत.

आता हरियाणामध्ये सर्व जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. याआधी 1 ऑक्टोबर रोजी हरियाणाची विधानसभा निवडणूक होणार होती. मात्र जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या (Jammu Kashmir Assembly Election) तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जम्मू काश्मीरमध्ये ठरल्याप्रमाणे 18 सप्टेंबरपासून तीन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. दुसऱ्या टप्प्याचं मतदान 25 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

सौजन्य : इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया

 

अखिल भारतीय बिश्नोई समाजाने केली होती मागणी

हरियाणामध्ये अखिल भारतीय बिश्नोई समाजानं (Bishnoi Community) निवडणुकीच्या तारखा बदलण्याची मागणी केली होती. बिश्नोई समाजासाठी आसोज अमावस्या उत्सव हा अत्यंत महत्वाचा सण असतो. यावर्षी हा उत्सव 2 ऑक्टोबर रोजी आहे.

या उत्सवात हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमधील बिश्नोई समाजातील कुटुंबं सहभागी होतात. यंदा 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी राजस्थानमध्ये जाणार आहेत. त्याच दिवशी मतदान ठेवल्यास त्यावर परिणाम होऊ शकतो. तसंच अनेकांना मतदानाच्या अधिकारापासून राहावं लागेल.

आपली परंपरा जोपासण्यासाठी मतदानाची तारीख बदलण्याची मागणी अखिल भारतीय बिश्नोई समाजाच्या अध्यक्षांनी केली होती. ती मान्य करण्यात आलेली.

निवडणुकांच्या तारखा बदलता येतात का?

यापूर्वीही निवडणुकीच्या तारखा बदलल्या गेल्या आहेत. भारतात राहणाऱ्या विविध समुदायांचा मान राखण्यासाठी या तारखा बदलण्यात आल्या आहेत. 2022 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीच्या वेळेस गुरु रविदास जयंतीच्या निमित्ताने वाराणसी जाणाऱ्या भक्तांसाठी निवडणुका एक आठवडा स्थगित करण्यात आल्या होत्या. तर 2022 मध्येच मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, ख्रिश्चन समुदायाच्या प्रार्थनेच्या सन्मानार्थ मतदानाची तारीख बदलली होती. तसेच 2023 राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, देवउठनी एकादशीच्या दिवशी होणारं मतदान पुढे ढकललं. हा दिवस राजस्थानमध्ये सामूहिक विवाहांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ