Grain ATM | ‘या’ ATM मधून पैसे नाहीत तर तांदूळ येतात बाहेर!

भारतातलं पहिलं ‘धान्य ATM’ ओडिसाच्या भुवनेश्वरमध्ये लाँच करण्यात आलं.
[gspeech type=button]

ATM मशिन्सचा वापर तुम्ही कशासाठी करता? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे, साधं आहे पैसे काढण्यासाठी. पण ओडिशातल्या भुवनेश्वरमध्ये मात्र ATM मधून पैसे नाहीत तर धान्यही काढलं जाऊ शकतं असं सांगितलं तर?

‘धान्य एटीएम’ काय असतं?

भारतातलं पहिलं अन्न म्हणजेच ‘धान्य ATM’ ओडिसाच्या भुवनेश्वरमध्ये नुकतंच लाँच करण्यात आलं. या ATM ला अन्नपूर्ती ATM मशिन असं म्हटलं जातं. सार्वजनिक रेशन धान्याचं वाटप करण्यासाठी हे ATM उभारण्यात आलं आहे. सार्वजनिक रेशन धान्य व्यवस्थेतील (PDS) चे लाभार्थी या ATM चा लाभ घेऊ शकतात. महत्वाचं म्हणजे हे ATM 24 तास उघडं असणार आहे.

सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या रेशनच्या धान्यासाठी रेशन दुकानांच्या बाहेर तास न् तास रांगा लावाव्या लागतात. आता या ATM मुळे भुवनेश्वरमधल्या लोकांना तरी दिलासा मिळाला आहे. या ATM मधून योग्य वजनातच तांदूळ बाहेर येतील. त्यामुळे वजनात फसवणूक होण्यासारख्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास सरकारच्या वतीने व्यक्त केला जात आहे.

लवकरच ओडिशाच्या 30 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे तांदूळ ATM स्थापन केले जातील, अशी माहिती ओडिशाचे अन्न मंत्री कृष्ण चंद्र पात्रा यांनी दिली.

              अन्नपूर्ती धान्य एटीएम

‘धान्य एटीएम’ कसं असतं?

अन्नपूर्ती मशिनमधून पाच मिनिटांत 50 किलोग्रॅपर्यंत धान्य निघू शकतं. त्यात चूक होण्याची शक्यता अगदी 0.01 टक्के असल्याचा दावा केला जात आहे. या ATM मशिनसाठी दर तासाला फक्त 0.6 वॅट वीज लागते. स्वयंचलित रिफिलिंगसाठी त्याला सौर पॅनेल्सनाही जोडलं जाऊ शकतं. विजेवर होणाऱ्या खर्चाच्या दृष्टीने हे अन्नपूर्ती मशीन किफायतशीर आहे.

तसंच त्याच्या मॉड्युलर आकारामुळे ते अगदी छोट्या जागेतही बसवलं जाऊ शकतं. हक्काचं अन्न घेण्यासाठी रेशनकार्ड धारकांचा कितीतरी वेळ जातो. पण हे ATM 24 तास सुरु असल्यामुळे  वाट बघण्याचा कालावधी जवळपास 70 टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भारतातलं पहिलं ग्रेन एटीएम (First Grain ATM) हरियाणा सरकारने 2021  साली गुरुग्राममध्ये सुरु केलं होतं. 

 या ATM मधून धान्य काढण्याची प्रक्रिया सोपी आहे. त्याचा वापर कसा करायचा ते पाहूया-

    टचस्क्रिन डिसप्लेवर रेशनकार्ड धारकाला त्याचं आधार किंवा रेशनकार्ड नंबर टाकावा लागेल.

    त्यानंतर बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन होईल.

     हे ऑथेंटिफिकेशन यशस्वी झाल्यानंतर ATM मधून तांदूळ येतील.

    एका वेळेस 25 किलोपर्यंत तांदूळ यातून मिळू शकतील

    वर्ल्ड फूड प्रोग्राम (World Food Program) च्या सहकार्याने या ATM ची स्थापना करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ