पासपोर्टमध्ये आता जोडीदाराचे नाव टाकण्यासाठी ‘Annexure J’ फॉर्म पुरेसा!

Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव जोडायचं असेल तर त्यासाठी आता मॅरेज सर्टिफिकेट द्यायची गरज भासणार नाही.
[gspeech type=button]

परदेशात जायचं असेल तर पासपोर्ट हे अत्यंत महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. भारतात पासपोर्ट देण्याचं काम परराष्ट्र मंत्रालय करतं. आता मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव जोडायचं असेल तर त्यासाठी आता मॅरेज सर्टिफिकेट द्यायची गरज भासणार नाही.

यापूर्वी, पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्य एकमेकांचं नाव जोडायचं असल्यास, मोठी किचकट प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. त्यात मॅरेज सर्टिफिकेट सादर करणं अनिवार्य होतं. अनेकदा नोकरी किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी पासपोर्टची गरज असताना, मॅरेज सर्टिफिकेट वेळेवर न मिळाल्याने पती-पत्नीला खूप अडचणींचा सामना करावा लागत होता. 

आजही भारतात अनेक ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट सहजपणे मिळत नाही. विशेषतः उत्तर प्रदेश (UP), बिहार आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये मॅरेज सर्टिफिकेटला तितकं महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे या राज्यांतील लोकांना त्यांच्या पासपोर्टमध्ये जोडीदाराचं नाव समाविष्ट करताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता भारत सरकारने मॅरेज सर्टिफिकेट सादर करण्याची अट पूर्णपणे रद्द केली आहे.

कोणते नवीन कागदपत्र लागेल ?

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की लग्नानंतर पासपोर्टमध्ये पत्नी किंवा पतीचं नाव जोडण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक नसेल. त्याऐवजी, अर्जदाराला स्वतःचं एक घोषणापत्र (self-declaration certificate) द्यावं लागेल. यासाठी मंत्रालयाने ‘Annexure J’ हा नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

या ‘Annexure J’ मध्ये अर्जदारांना त्यांच्या लग्नाचा फोटो आणि एकत्र काढलेले फोटो अपलोड करण्याचा ऑप्शन असेल. त्यासोबतच, दोघांच्याही स्वाक्षऱ्या आवश्यक असतील आणि काही आवश्यक माहिती भरावी लागेल. हे घोषणापत्र लग्नाच्या प्रमाणपत्रासारखंच ग्राह्य धरलं जाईल. आणि याच आधारावर पती-पत्नीचं नाव पासपोर्टमध्ये जोडलं जाईल.

काय आहे हे ‘Annexure J’ ?

हा एक प्रकारचा संयुक्त घोषणापत्र फॉर्म आहे. जो विवाहित जोडप्यांना त्यांच्या पासपोर्टवर एकमेकांचं नाव जोडण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या फॉर्ममध्ये दोन्ही जोडीदारांची नावे,पत्ता ,ओळखपत्र तपशील आणि त्यांच्या वैवाहिक स्थितीची आणि एकत्र राहण्याची औपचारिक घोषणा नमूद केलेली असते.

अर्ज भरताना काही गोष्टी लक्षात ठेवा

  • फॉर्मवर पती-पत्नीचा एकत्र सही केलेला एकत्र फोटो  (self-attested)  लावावा
  • घोषणापत्राचं ठिकाण आणि तारीख स्पष्टपणे नमूद करावी
  • आधार कार्ड, वोटर आयडी आणि पासपोर्ट क्रमांक असल्यास वैयक्तिक ओळख क्रमांक भरावे
  • घोषणापत्र वैध ठरण्यासाठी फॉर्ममधील सर्व माहिती अचूकपणे भरणं आवश्यक

हा नियम महत्त्वाचा का आहे?

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पासपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, हा नवीन नियम देशातील प्रादेशिक असमानता दूर करण्यासाठी मदत करेल. महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील अनेक राज्ये विवाह नोंदणीला अधिक महत्त्व देतात. आणि तिथे विवाह नोंदणी प्रमाणपत्र सहज उपलब्ध होते. मात्र, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये विवाह नोंदणीची प्रक्रिया तितकी सोपी नाही. त्यामुळे या भागातील लोकांना पासपोर्टसाठी अर्ज करताना विवाह प्रमाणपत्र सादर करणं कठीण जात होतं.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘Annexure J’ विशेषतः अशा राज्यांतील अर्जदारांसाठी खूप उपयुक्त ठरेल जिथे विवाह नोंदणी अनिवार्य नाही. यामुळे या भागातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: तुम्हांला भारतीय पासपोर्टच्या पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगांचा अर्थ माहीत आहे का?

इतर बदल: जोडीदाराचे नाव बदलणे किंवा हटवणे

जरी ‘Annexure J मुळे जोडीदाराचं नाव जोडण्याची प्रक्रिया सोपी झाली असली, तरी ते पासपोर्टमधून काढण्यासाठी किंवा बदलण्यासाठी काही विशिष्ट कायदेशीर कागदपत्रं आवश्यक असतील:

  1. पती/पत्नीचं नाव काढण्यासाठी: घटस्फोटाचा अधिकृत आदेश (decree of divorce) सादर करणं आवश्यक असेल.
  2. पती/पत्नीचं नाव बदलण्यासाठी (पुनर्विवाह किंवा मृत्यू झाल्यास): अर्जदारांना खालील कागदपत्रं सादर करावी लागतील
  • मागील जोडीदाराचा घटस्फोटाचा हुकूम किंवा मृत्यू प्रमाणपत्र.
  • पुनर्विवाह प्रमाणपत्र किंवा नवीन Annexure J
  • QR-कोड असलेले आणि अद्ययावत ओळखपत्रं.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने ‘Annexure J सुरू करण्याचा निर्णय पासपोर्ट प्रक्रिया अधिक  सुलभ बनवण्याच्या दिशेने उचललेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ज्या अनेक भारतीयांना विवाह नोंदणीमध्ये अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठी हा बदल एक मोठा अडथळा दूर करणारा ठरेल आणि त्यांच्या पासपोर्ट अर्जाची प्रक्रिया अधिक सोपी होईल.

4 Comments

  • Shelbynusly

    [url=https://traftop.biz/]This platform[/url] is a trusted visitor exchange where you can purchase or monetize website visitors. Increase site visibility and grow your website with effective traffic solutions.

  • Shelbynusly

    [url=https://traftop.biz/]This platform[/url] is a reliable visitor exchange where you can purchase or monetize website visitors. Increase site visibility and develop your website with effective traffic solutions.

  • Shelbynusly

    [url=https://traftop.biz/]Traftop.biz[/url] is a modern traffic marketplace where you can buy or sell website visitors. Increase site visibility and develop your website with effective traffic solutions.

  • MelissaIrrah

    Привлечь трафик на сайт

    [img]https://foto-host.site/uploads/img_0df23e2442.png[/img]

    Регулярный поток аудитории позволяет развивать веб-проект, оценивать эффективность страниц и оперативнее получать информацию о поведении пользователей. Поэтому возможность купить трафик на сайт может оказаться полезной как для молодого веб-проекта, так и для уже работающего ресурса. Главное – заранее определять тематику ресурса, географию аудитории и цели продвижения.

    Заказать посетителей на сайт можно для онлайн-магазина, сайта компании, контентного проекта, веб-сервиса или информационного сайта. Качественная аудитория помогает повысить посещаемость ресурса, привлечь дополнительную аудиторию и понять, насколько хорошо страницы заинтересовывают посетителей.

    При выборе услуги стоит обращать внимание не только на число переходов. Следует учитывать источники переходов, продолжительность посещения, глубина взаимодействия с сайтом и релевантность посетителей тематике сайта. Тематические посетители обычно предпочтительнее нецелевых визитов, поскольку они потенциально заинтересованы в материалах, предложениях или услугах сайта.

    Источник [url=https://traftop.biz/]traftop.biz[/url]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

4 Responses

  1. Привлечь трафик на сайт

    [img]https://foto-host.site/uploads/img_0df23e2442.png[/img]

    Регулярный поток аудитории позволяет развивать веб-проект, оценивать эффективность страниц и оперативнее получать информацию о поведении пользователей. Поэтому возможность купить трафик на сайт может оказаться полезной как для молодого веб-проекта, так и для уже работающего ресурса. Главное – заранее определять тематику ресурса, географию аудитории и цели продвижения.

    Заказать посетителей на сайт можно для онлайн-магазина, сайта компании, контентного проекта, веб-сервиса или информационного сайта. Качественная аудитория помогает повысить посещаемость ресурса, привлечь дополнительную аудиторию и понять, насколько хорошо страницы заинтересовывают посетителей.

    При выборе услуги стоит обращать внимание не только на число переходов. Следует учитывать источники переходов, продолжительность посещения, глубина взаимодействия с сайтом и релевантность посетителей тематике сайта. Тематические посетители обычно предпочтительнее нецелевых визитов, поскольку они потенциально заинтересованы в материалах, предложениях или услугах сайта.

    Источник [url=https://traftop.biz/]traftop.biz[/url]

  2. [url=https://traftop.biz/]Traftop.biz[/url] is a modern traffic marketplace where you can buy or sell website visitors. Increase site visibility and develop your website with effective traffic solutions.

  3. [url=https://traftop.biz/]This platform[/url] is a reliable visitor exchange where you can purchase or monetize website visitors. Increase site visibility and develop your website with effective traffic solutions.

  4. [url=https://traftop.biz/]This platform[/url] is a trusted visitor exchange where you can purchase or monetize website visitors. Increase site visibility and grow your website with effective traffic solutions.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
दरवर्षी 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातो. आपल्या देशातील महिलांना गर्भधारणा, बाळंतपण आणि प्रसूतीकाळानंतर येणाऱ्या धोक्यांबद्दल

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ