केरळच्या 59 वर्षीय महिलेनं कुठलेही प्रशिक्षण न घेता केला एव्हरेस्ट बेस कॅम्प सर 

Kerala climbs Everest Base Camp : केरळमध्ये राहणाऱ्या वासंती चेरुवित्तील यांनी वयाचं बंधन तोडून एकटीने एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत चढाई केली. विशेष गोष्ट म्हणजे, त्यांनी हे कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय केलं. फक्त YouTube व्हिडिओ पाहून त्यांनी स्वतःला प्रशिक्षण दिलं आणि  हा अविस्मरणीय प्रवास पूर्ण केला.
[gspeech type=button]

हिंमत असेल, तर वयही हरतं! केरळच्या 59 वर्षांच्या वासंती चेरुवित्तील यांनी हे खरं करून दाखवलं आहे. केरळमध्ये राहणाऱ्या या महिलेने वयाचं बंधन तोडून एकटीने एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत चढाई केली. विशेष गोष्ट म्हणजे, त्यांनी हे कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय केलं. फक्त YouTube व्हिडिओ पाहून त्यांनी स्वतःला प्रशिक्षण दिलं आणि  हा अविस्मरणीय प्रवास पूर्ण केला.

अडथळ्यांवर मात करत यश मिळवले

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील ताळीपरंबा इथं राहणाऱ्या वासंती या व्यवसायाने टेलर आहेत. एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचा त्यांचा  प्रवास सोपा नव्हता. खराब हवामानामुळे वासंती यांची लुक्ला इथे जाणारी फ्लाईट रद्द झाली. मात्र, त्यांनी हार न मानता पर्यायी मार्ग शोधला. 15 फेब्रुवारीला नेपाळमधील सुरके इथून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. आणि 23 फेब्रुवारीला, 5364 मीटर उंचीवर असलेल्या ‘साउथ बेस कॅम्प’पर्यंत त्या पोचल्या. या प्रवासात त्यांची जगभरातील अनेक ट्रेकर्सशी ओळख झाली. यात भारतातील एका वडील-मुलाच्या जोडीचाही समावेश होता. यावेळी वासंती यांना एका  जर्मनीच्या जोडप्याने मदतदेखील केली होती.

9 दिवसांच्या ट्रेकिंगमध्ये त्या दररोज 6 ते 7 तास चालायच्या. हवामान आणि उंचीचा विचार करून थोड्या थोड्या वेळाने विश्रांती घेत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचल्यावर, त्यांनी केरळची पारंपरिक ‘कसावु साडी’  परिधान करून भारताचा झेंडा फडकवला आणि आनंद साजरा केला.

फक्त YouTube व्हिडिओंमधून घेतले प्रशिक्षण

विशेष म्हणजे वासंती  यांनी कोणत्याही प्रशिक्षकाची मदत न घेता फक्त YouTube व्हिडिओ पाहून स्वतःला प्रशिक्षण दिले. या प्रवासाने त्यांनी सिद्ध केले की वय ही केवळ एक संख्या आहे. आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे महिलांना एकट्याने प्रवास करण्याची नवी प्रेरणा मिळाली.

वासंती  यांनी फक्त शारीरिक तयारीच नाही केली, तर प्रवासात संवाद साधणे सोपे व्हावे म्हणून हिंदी भाषा शिकली. त्यांनी YouTube व्हिडिओंच्या मदतीने ट्रेकिंगबाबत संपूर्ण माहिती मिळवली आणि आवश्यक ती तयारी केली.

रूढी परंपरांना मागे टाकत महिलांसाठी आदर्श 

वासंती  यांनी याआधीही एकट्याने प्रवास केला आहे. 2024 मध्ये त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना एकटीने प्रवास करणे कठीण आहे असं सांगितलं. मात्र वासंती यांनी एकटीने थायलंडचा प्रवास केला आणि सिद्ध केले की महिलाही स्वतंत्रपणे प्रवास करू शकतात. या प्रवासात त्यांच्या मुलांनीही त्यांच्या धाडसी स्वभावाला नेहमीच प्रोत्साहन दिले.

वासंती  म्हणतात, “चिकाटी आणि योग्य दृष्टिकोन असेल, तर महिला जगात कुठेही सुरक्षितपणे आणि निर्भयपणे प्रवास करू शकतात.”

स्वतःच्या मेहनतीवर प्रवासाचा खर्च उचलला

वासंती यांच्या पतीचं निधन झालं आहे. त्या उदरनिर्वाहाकरता शिलाई काम करतात. या कमाईतूनच त्यांनी प्रवासाचा खर्च उचलतात. त्यांच्या मुलांकडून कधीकधी त्यांना थोडी मदत होते, पण त्यांनी स्वतःच्या हिमतीवर जग पाहण्याचे ठरवलं आहे. त्यांचे पुढचे स्वप्न चीनची मोठी भिंत पाहण्याचे आहे.

वासंती चेरुवित्तील यांनी सिद्ध केले की, वय किंवा परिस्थिती काहीही असली तरी स्वप्न पूर्ण करणे शक्य आहे. त्यांची ही कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. इच्छाशक्ती, मेहनत आणि योग्य तयारी असेल, तर कोणतेही ध्येय गाठता येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ