ॲपल कंपनी एअरपॉड्समध्ये नवीन भाषांतर फिचर आणणार!

Apple AirPods : ॲपल कंपनी आपल्या  एअरपॉड्समध्ये एक नवा फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरमुळे वापरकर्त्यांना दुसऱ्या भाषेत बोलणाऱ्या लोकांशी संवाद साधणे अधिक सोपे होईल.
[gspeech type=button]

ॲपल कंपनी आपल्या  एअरपॉड्समध्ये एक नवा फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरमुळे वापरकर्त्यांना दुसऱ्या भाषेत बोलणाऱ्या लोकांशी संवाद साधणे अधिक सोपे होईल. ब्लूमबर्ग न्यूजच्या रिपोर्टनुसार,  नवीन फिचरच्या मदतीने एअरपॉड्स तुमच्या भाषेत भाषांतर करतील. यामुळे, तुम्ही जेव्हा दुसऱ्या भाषेत बोलणाऱ्या व्यक्तिशी संवाद साधाल, तेव्हा त्यांचे बोलणे लगेच तुमच्या भाषेत तुम्हाला ऐकायला मिळेल.

हे फिचर एअरपॉड्सच्या आगामी सॉफ्टवेअर अपडेटमध्ये उपलब्ध होईल. आणि त्यासोबतच iOS 19 या ॲपल ऑपरेटिंग सिस्टमच्या नवीन अपडेटसोबतच येईल. यामुळे वापरकर्त्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद साधताना सोयीचे होईल.

अद्याप ॲपलने या बातमीवर अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, गेल्या वर्षी ॲपलने सांगितलं होतं की, एअरपॉड्स प्रो 2 च्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे एअरपॉड्स ऐकण्याची यंत्रणा (hearing aid) म्हणून वापरता येतील.

ॲपल कंपनी यावर्षी त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये मोठे बदल करणार आहे. आयफोन, आयपॅड आणि मॅक या उपकरणांच्या ऑपरेटिंग सिस्टम आणि इंटरफेस मध्ये पूर्णपणे बदल करणार असल्याची माहिती ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये दिली आहे.

याशिवाय, ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ॲपल कंपनी कॅमेरा असलेले नवीन एअरपॉड्स बनवण्याचा विचार करत आहे. या एअरपॉड्समुळे, बाहेरील कॅमेऱ्यांच्या मदतीने वापरकर्त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दल माहिती मिळवता येईल. यामुळे, स्मार्ट चष्म्यांसारखे काही फिचर्स एअरपॉड्समध्ये मिळू शकतात.या फिचरमुळे वापरकर्ते सिरीला त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दल प्रश्न विचारू शकतील आणि फोन खिशातून न काढता त्यांना उत्तर मिळेल.

पण ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी सांगितलं की, अशा प्रकारचे कॅमेरा असणारे एअरपॉडस् बाजारात येण्यास आणखी काही दिवस लागतील.आणि एअरपॉड्स प्रो 3 या वर्षी बाजारात येणार असले तरी, त्यात कॅमेरा असणार नाही.

ॲपलने अलीकडेच आयफोन 16 मध्ये ‘व्हिज्युअल इंटेलिजन्स’ हे नवीन तंत्रज्ञान जोडले आहे. मिंग-ची कुओ नावाचे तज्ज्ञ आहेत. जे कंपन्यांना लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा कसा होतो हे सांगतात. त्यांनी सांगितलं की, ॲपलची व्हिजन प्रो आणि इतर हेडसेटसारखी उपकरणं या कॅमेऱ्यांसोबत असलेल्या एअरपॉड्सचा वापर ‘स्पेशिअल ऑडिओ’ अनुभवासाठी करू शकतात. याशिवाय, या उपकरणांमधील कॅमेऱ्यांद्वारे एअरपॉड्समध्ये ‘हवेत हातवारे करून नियंत्रण’ करणे शक्य होईल. उदाहरणार्थ, जर वापरकर्ते विशिष्ट दिशेने मान वळवतील, तर त्या दिशेतील आवाज अधिक ऐकू येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Air travel: प्रवाशांना यापुढे विमानतळावर चेक-इन करण्याची किंवा बोर्डिंग पास बाळगण्याची गरज भासणार नाही.आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने यासाठी पुढाकार
Luna Recycles Mission : अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यामध्ये मानवी विष्ठा, मूल विसर्जन आणि उलट्या यासारख्या
Dire wolves : सुमारे साडेबारा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेला अतिशय हिंस्र शिकारी प्राणी – डायरे वुल्फ (Dire Wolf) आता

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ