व्हे प्रोटीन – तरुणांच्या फिटनेसची खरी गरज का?

Whey protein powder : आजकाल ‘व्हे प्रोटीन’ हा शब्द प्रत्येक जिममध्ये, फिटनेस सेंटरमध्ये आणि सोशल मीडियावर वारंवार ऐकायला मिळतो. पण नक्की व्हे प्रोटीन म्हणजे काय? खरंच ते घ्यावे का? कोणत्या वयोगटासाठी उपयुक्त आहे? आणि किती प्रमाणात घ्यावे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण इथे पाहणार आहोत.
[gspeech type=button]

आजकाल ‘व्हे प्रोटीन’ हा शब्द प्रत्येक जिममध्ये, फिटनेस सेंटरमध्ये आणि सोशल मीडियावर वारंवार ऐकायला मिळतो. पण नक्की व्हे प्रोटीन म्हणजे काय? खरंच ते घ्यावे का? कोणत्या वयोगटासाठी उपयुक्त आहे? आणि किती प्रमाणात घ्यावे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण इथे पाहणार आहोत.

व्हे प्रोटीन म्हणजे काय?

व्हे प्रोटीन (Whey Protein) हे दुधापासून तयार केले जाते. दुधामध्ये दोन प्रकारची प्रथिने असतात—केसीन (Casein) आणि व्हे (Whey). चीज/ पनीर बनवताना जो द्रव वेगळा हो तो, त्यालाच व्हे म्हणतात. यावर प्रक्रिया करून व्हे प्रोटीन पावडर तयार केली जाते.

व्हे प्रोटीनची गरज कोणाला असते?

व्हे प्रोटीन ही मुख्यतः मसल्स ग्रोथ, रिकव्हरी आणि फिटनेस वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. पण कोणाला त्याची गरज अधिक असते?

1.जिम करणारे आणि बॉडीबिल्डर्स – जास्त प्रमाणात वर्कआउट करणाऱ्यांना स्नायूंच्या वाढीसाठी जास्त प्रोटीन आवश्यक असते.

2.खेळाडू (Athletes) – जास्त एनर्जी आणि स्टॅमिनासाठी प्रोटीन मदत करते.

3.वजन कमी करू इच्छिणारे लोक – व्हे प्रोटीन मेटाबॉलिझम  वाढवते आणि स्नायू टिकवून ठेवण्यास मदत करते.

4.शाकाहारी लोक – जे लोक अंडी किंवा मांस खात नाहीत, त्यांच्यासाठी व्हे प्रोटीन हा एक चांगला पर्याय आहे.

5.वृद्ध लोक – वृद्धापकाळात स्नायू कमकुवत होण्याचा धोका असतो, त्यामुळे व्हे प्रोटीन हे स्नायू टिकवण्यासाठी उपयुक्त ठरते.

हे ही वाचा : ‘औषधे आणि खाद्यपदार्थांचे’ इंटरॲक्शन!

व्हे प्रोटीनचे प्रकार – कोणते निवडावे?

व्हे प्रोटीनचे तीन मुख्य प्रकार आहेत:

1.व्हे प्रोटीन कन्सन्ट्रेट (Whey Protein Concentrate – WPC)

यात 70-80% प्रोटीन असते आणि उरलेले कार्बोहायड्रेट्स आणि फॅट असते.

ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय.

2.व्हे प्रोटीन आयसोलेट (Whey Protein Isolate – WPI)

यात 90-95% प्रोटीन असते आणि लॅक्टोजचे प्रमाण कमी असते.

ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा लॅक्टोज इन्टॉलरन्स आहे, त्यांनी हे घ्यावे.

3.व्हे प्रोटीन हायड्रोलायझेट (Whey Protein Hydrolysate – WPH)

पचनासाठी सर्वात सोपे आणि सर्वात जलद शोषले जाणारे प्रोटीन.

ॲथलीट्स आणि खेळाडूंना हे अधिक फायदेशीर असते.

हे ही वाचा : भारतीय खाद्यसंस्कृतीत पारंपरिक अन्नसंयोग

व्हे प्रोटीन किती प्रमाणात घ्यावे?

प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन गरजेनुसार प्रोटीनचे प्रमाण वेगवेगळे असते.

सामान्य नियम:

बैठी जीवनशैली असलेल्यांसाठी – प्रति किलो शरीराच्या वजनासाठी 0.8 ग्रॅम प्रोटीन

सरासरी फिटनेस फॉलो करणाऱ्यांसाठी – 1.2 – 1.5 ग्रॅम प्रति किलो

जिम करणाऱ्यांसाठी / बॉडीबिल्डर्ससाठी – 1.6 – 2.2 ग्रॅम प्रति किलो

वजन कमी करणाऱ्यांसाठी – 1.5 – 2 ग्रॅम प्रति किलो

उदाहरणार्थ, जर 70 किलो वजन असलेली व्यक्ती सरासरी फिटनेस फॉलो करत असेल, तर तिला 85 – 105 ग्रॅम प्रोटीन दररोज आवश्यक असते. यातील काही प्रोटीन आहारातून मिळेल, आणि उरलेले व्हे प्रोटीनमधून पूरक स्वरूपात घेतले जाते.

व्हे प्रोटीन घेताना काय घ्यायची काळजी

1.अती प्रमाणात घेऊ नये – शरीराला गरजेपेक्षा जास्त प्रोटीन दिल्यास किडनीवर ताण येऊ शकतो.

2.सोबत भरपूर पाणी प्यावे – प्रोटीनच्या योग्य मेटाबॉलिजमसाठी पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे.

3.ऑथेंटिक ब्रँड निवडावा – लोकल किंवा नकली प्रोटीन घेतल्यास अपाय होऊ शकतो. युट्युब वर पुष्कळ प्रोटीन ब्रँड्सचे लॅब रिपोर्ट्स उपलब्ध असतात ते जरूर बघावेत.

हे ही वाचा : सोबत हवीच अशी ‘आरोग्य उपकरणे’

व्हे प्रोटीन – घ्यावे की नाही?

जर तुमच्याआहारातून पुरेसे प्रोटीन मिळत असेल, तर व्हे प्रोटीन घेण्याची गरज नाही. पण जर आहारातून पुरेसे प्रोटीन मिळत नसेल आणि फिटनेस वाढवायचा असेल, तर योग्य प्रमाणात आणि गरजेप्रमाणे व्हे प्रोटीन घेणे फायदेशीर ठरू शकते.

निष्कर्ष

तरुणांसाठी व्हे प्रोटीन हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे, पण तो फक्त फॅशन म्हणून न घेता, गरजेनुसार योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारात घेणे महत्त्वाचे आहे.

आता आपण पुढील भागात पाहू, “व्हे प्रोटीनचे साइड इफेक्ट्स आणि योग्य पद्धतीने सेवन कसे करावे?”

11 Comments

  • मुग्धा

    Very informative

  • Vaishali Pingle

    Thank you for this Informative article

  • Kalpana Joshi

    Amazing information

  • MRS. MEDHA B. PATHAK

    अतिशय नवीन पण उपयोगी माहिती. तुमच्या लेखांमधून नवनवीन गोष्टी समजतात आणि ज्ञानात भर पडते. धन्यवाद.

  • D.V.HUPRIKAR

    नवीन माहिती समजली. उपयोगी आहे.अनेक ब्रेड उपलब्ध असल्याने कुणाचे योग्य आहे हे निर्देशित करण गरजेच आहे

  • Sandhya Jadhav

    Khup ch upyogi mahiti dili ki konhi konte type che whey protein ghyavet.
    Thank you

  • प्रणाली प्रशांत वैद्य.

    खूप छान माहिती दिली. व्हे प्रोटीन कोणी कोणतं घ्यावं आणि किती घ्यावं हे कळलं. आणि त्याचं कोणाला किती महत्व आहे ते समजलं.

  • Madhavi Manohar

    अतिशय उपयुक्त माहिती

  • Manohar M. H.

    Informative Article !
    लेखांत जर कोणत्या ब्रँडची प्रोटिन्स चांगली किंवा उपयुक्त असतात ते सांगितले असते तर सर्व सामान्यांस दिशा दर्शक झाले असते. ( पाउडर चे स्वरूपांत)

  • Upendra Pethe

    Good .. very well written

  • Vijay Mulye

    Good, informative article

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

11 Responses

  1. Informative Article !
    लेखांत जर कोणत्या ब्रँडची प्रोटिन्स चांगली किंवा उपयुक्त असतात ते सांगितले असते तर सर्व सामान्यांस दिशा दर्शक झाले असते. ( पाउडर चे स्वरूपांत)

  2. खूप छान माहिती दिली. व्हे प्रोटीन कोणी कोणतं घ्यावं आणि किती घ्यावं हे कळलं. आणि त्याचं कोणाला किती महत्व आहे ते समजलं.

  3. नवीन माहिती समजली. उपयोगी आहे.अनेक ब्रेड उपलब्ध असल्याने कुणाचे योग्य आहे हे निर्देशित करण गरजेच आहे

  4. अतिशय नवीन पण उपयोगी माहिती. तुमच्या लेखांमधून नवनवीन गोष्टी समजतात आणि ज्ञानात भर पडते. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ