भारत बनला फ्रेंच फ्राइजचा सगळ्यात मोठा निर्यातदार!

French Fries Exporter : सन 2000 साली भारताने 5 हजार टन फ्रोझन फ्रेंच फ्राइज आयात केले होते. आर्थिक वर्ष 2023 - 2024 मध्ये भारताने तब्बल 1 लाख 35 हजार 877 टन फ्रेंच फ्राइजची निर्यात करुन जगातला सगळ्यात मोठा फ्रेंच फ्राइज निर्यातदार देश म्हणून अग्रस्थानावर आहे.
[gspeech type=button]

हॉटेलमध्ये जा किंवा कोणत्याही समारंभात कार्यक्रम सुरू झाला की सुरुवातीला स्टार्टर सर्व्ह केलं जातं. स्टार्टर म्हटलं म्हणजे फ्रेंच फ्राइज आलेच. हे एक समीकरणच झालं आहे.  बटाट्यापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. पण हा फ्रेंच फ्राइजचा प्रकार सगळ्यांचा आवडता झालेला आहे.  

भारतामध्ये या पदार्थाचं आगमन सन 1992 साली झालं. त्यावेळेला भारतातल्या प्रसिद्ध मोठ्या हॉटेलमध्येच हा पदार्थ मिळायचा. आणि तो ही अमेरिकेची फूड प्रोसेस्ड कंपनी लांब वेस्टटॉनमधून मागवला जायचा. हळूहळू या पदार्थांची क्रेझ वाढू लागली. सन 2000 मध्ये  भारतात जवळपास 5 हजार टन हून अधिक सरळ रेषेत, आपल्या बोटाच्या आकारा एवढे कापलेल्या बटाट्याचे तुकडे आयात केले. सन 2010 – 2011 मध्ये तर तब्बल 7 हजार 863 टन फ्रेंच फ्राईज आयात केले. 

पण आज ही परिस्थिती बदलली आहे. सन 2023 – 2024 मध्ये तर भारताने फ्रेंच फ्राइजचा एक पॅकेटही आयात केला नाही. याचा अर्थ  भारतीयांनी फ्रेंच फ्राइज खायचं बंद केलं नाही. तर भारताने त्यावर्षी सुमारे 1 लाख 35 हजार 877 टन्स फ्रेंच फ्राइजची निर्यात केली. यातून 1 लाख 47 हजार 873 कोटी रुपयाचा व्यवसाय झाला. आज जगातला सगळ्यात मोठा फ्रेंच फ्राइज निर्यातदार म्हणून ओळख मिळवली आहे.

भारतीयांचं आणि फ्रेंच फ्राईजचं नातं

सन 1992 साली उच्चभ्रू हॉलेटमध्येच फ्रेंच फ्राइज हा पदार्थ उपलब्ध असायचा.  चार वर्षानंतर अमेरिकन फूड चेन कंपनी मॅकडोनल्डमध्ये सर्वसामान्यांना हा पदार्थ खायला मिळू लागला. त्यावेळी भारतातल्या सर्व मॅकडोनल्डमध्ये कॅनडातील मॅकचेन फूड कंपनीकडूनच हे फ्रेंच फ्राइज पुरवले जायचे.

त्यामुळे भारतामध्ये फ्रोझन फ्रेंच फ्राइजची मोठ्या प्रमाणात आयात होऊ लागली. त्यावेळी वर्षाला जवळपास 1,400 कोटी रूपयाचे 1 लाख टन फ्रेंच फ्राइजचा खप होत असे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा पदार्थ बाहेरून मागवला जायचा.  सन  2000 साली सुमारे 5 हजार टन फेंच फ्राइज आयात केले. तर सन 2010 – 2011 साली तब्बल 7 हजार 863 टन फ्रेंच फ्राइज आयात केले.

भारत फ्रेंच फ्राइजचा आयातदार ते सर्वात मोठा निर्यातदार

हजारो टन फ्रेंच फ्राइज आयात करणारा देश, ते लाखो टन फ्रेंच फ्राइज निर्यात करणारा जगातला सगळ्यात मोठा देश, म्हणून सन 2023-2024 मध्ये भारताला ओळख मिळाली.

केंद्र सरकारच्या अहवालानुसार, सन 2023-2024 मध्ये भारताने 1 लाख 35 हजार 877 टन्स फ्रेंच फ्राइज निर्यात केले.  या निर्यातीतून 1 लाख 47 हजार 873 कोटी रुपयाचा व्यवसाय झाला. एप्रिल 2024 ते ऑक्टोबर 2024 मध्ये भारतातून 1 लाख 6 हजार 506 टन फ्रेंच फ्राइज निर्यात केले. सुमारे 1 लाख 5 हजार 692 कोटी रुपयाची ही उलाढाल होती. महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशात जेवढा बटाटा वापरला जात नाही, तेवढी निर्यात ही बटाट्यापासून तयार केलेल्या फ्रोझन फ्रेंच फ्राइजची होते. 

भारतातून फ्रेंच फ्राइजची निर्यात कुठे होते?

आशिया खंडातील उत्तरेकडील राज्यात भारतातून फ्रेंच फ्राइजची निर्यात होते. यामध्ये फिलिपिन्स, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम, कंम्बोडिया, ब्रुनाई, लाओस, म्यानमार, सिंगापूर, थायलंड या देशांचा समावेश आहे. त्याशिवाय, सौदी अरेबिया, संयुक्त अरब आमिराती, ओमान, जपान आणि तैवान मध्ये सुद्धा भारतातून फ्रेंच फ्राइज निर्यात केले जातात. 

हायफन फूडस प्राय. लिमिटेड ही देशातली सर्वात मोठी फ्रेंच फ्राइज निर्यात करणारी कंपनी आहे. या कंपनीचे सीईओ हर्ष करमचंदानी यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली की,हायफन फूडस कंपनी  युरोप आणि अमेरिकामधल्या प्रोसेस्ड फूड पुरवणाऱ्या कंपन्यांना पर्याय म्हणून नावारुपाला येत आहे. या संपूर्ण बाजारपेठेत भारतातली हायफन फूडस कंपनी प्रतिस्पर्धी कंपनी म्हणून उदयाला आली आहे. 

फ्रेंच फ्राइजचा निर्यातदार!  भारताला हे कसं शक्य झालं?

फ्रेंच फ्राइजचा आयातदार ते निर्यातदार या भारताच्या प्रवासात अनेक घटकांचा सहभाग आहे.  यात सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे, फूड प्रोसेससाठी आवश्यक असलेली दर्जेदार बटाटे. फ्रोझन फूडसाठी सनताना, इनोव्हेटर, केनेबेक, कुफ्री फ्रायसोना, कुफ्री फ्रायोम, लेडी रोसेटा, कुफ्री चिपसोना या जातीतल्या बटाट्यांची आवश्यक होती. शेतकऱ्यांनी या जातीतल्या बटाट्याचं उत्पन्न घ्यायला सुरुवात केल्यामुळे पुढे त्यावर प्रक्रिया करणं सोपं झालं. 

सुयोग्य बटाट्याच्या उपलब्धतेनुसार, कंत्राटी शेतीचा फायदा सुरू फूड प्रोसेसिंग कंपन्यांना झाला. कंत्राटी शेती अंतर्गत कंपन्यांच्या गरजेनुसार उत्पन्न घेतलं गेलं. त्यामुळे यामध्ये शेतकरी आणि कंपन्या दोघांचाही फायदा झाला. 

हायफन फूडस सीईओ हर्ष करमचंदानी यांनी माहिती दिली की, हायफन फूडस यावर्षी गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश राज्यातील शेतकऱ्यांकडून 4 लाख टन बटाट्यांची खरेदी करणार आहे. यासाठी प्रति किलो 13.8 रुपयाचा भाव दिला जाणार आहे. या मागणीनुसारच शेतकरी कंपनीला गरज असलेल्या बटाट्याच्या जातीची लागवड करणार आहे. 

फ्रेच फ्राइज निर्यातीमधले दुसऱ्या क्रमांकाची कंपनी  इस्कॉन बालाजी फूडने वर दिलेल्या जातीतल्या बटाट्यापेक्षा अन्य तीन युरोपियन जातीतले बटाट्याचा वापर सुरू केला आहे. या जातीतल्या बटाट्याची लागवड शेतकऱ्यांनी करावी यासाठी ही कंपनी चांगली दर्जेदार बियाणे सुद्धा शेतकऱ्यांना पुरवते. 

अधिक उत्पन्नासाठी कंपन्यांकडून कार्यशाळा

कमी जागेत, कमी खर्चात शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न घेता यावं यासाठी या कंपन्या शेतकऱ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात. सप्टेंबर 2024 मध्ये हायफन फूडस कंपनीकडून हायफन पाठशाला कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यशाळेत कंपनीने शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने कमी जागेत आणि दोन रोपांमध्ये कमी अंतरावर लागवड कशी करावी याविषयी मार्गदर्शन केलं. पारंपारिक पद्धतीने शेतकरी चार ओळीत  60 इंचाच्या अंतरावर लागवड करीत असे. त्याऐवजी दोन ओळीत दोन रोपांमध्ये 45 इंचाचं अंतर ठेवणं कसं सोयीचं आहे हे पटवून दिलं. एका एकरमध्ये जेथे पूर्वी 25 बॅग बियाणं लागायचं त्याऐवजी 19 बियाण्यांच्या पिशव्या शेतकऱ्यांना पुरू लागल्या. त्याशिवाय लागवडीसाठी लागणारं खताचा वापर 20 टक्क्यांने आणि पाण्याचा वापर 50 टक्क्यांने कमी झाला. थोडक्यात कमी खर्चात, कमी जागेत अधिक उत्पन्न मिळू लागलं. 

फ्रेंच फ्राइजची वाढती मागणी

बिझनेस रिसर्च कंपनीच्या सर्वेक्षणानुसार, येत्या काही वर्षात जागतिक बाजारपेठेत फ्रेंच फ्राइजला मोठी मागणी असणार आहे. सन 2024 साली 17.45 अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल झाली आहे. तर 2025 वर्षामध्ये यामध्ये 6.2 टक्क्यांने वाढ होत 18.54 अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. जगभरात रेडी टू इट म्हणजे तयार खाद्यपदार्थांची मागणी वाढत आहे. त्यामुळे आपसुकच त्यामध्ये फ्रेंच फ्राइज वा अन्य बटाट्यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांचा मोठा वाटा आहे. सन 2023 मध्ये या फ्रेंच फ्राइजच्या निर्यातीतून 1.38 अब्ज अमेरिकन डॉलर एवढं उत्पन्न मिळालं.  या अशाच  वाढत्या मागणीमुळे सन 2034 पर्यंत भारताला 2.25 अब्ज अमेरिकन डॉलर एवढं उत्पन्न मिळेल अशी शक्यता व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ