महाकुंभ हा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे. या मेळ्यात सहभागी होऊन भाविक पवित्र संगम स्नान करतात. पण या धार्मिक अनुभवासोबतच, प्रयागराजमधील खाद्यपदार्थांची चवही खूपच खास आहे. म्हणून, जर तुम्ही महाकुंभ मेळ्यात जात असाल तर या खास खाद्य पदार्थांची चव घेणं विसरू नका ! चला तर मग, पाहूया प्रयागराजमधील काही प्रसिद्ध आणि स्वादिष्ट पदार्थ.
देहाती रसगुल्ला
30 वर्षांहून अधिक जुने असलेली हे दुकान आपल्या चवदार रसगुल्ल्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. यांचा हलका,ताजा आणि गोड रसगुल्ला जेवणानंतर खाणे याचं एक वेगळंच आकर्षण आहे.
हरीराम अँड सन्स
हरीराम अँड सन्स हे स्थानिक स्नॅक्सचं दुकान आहे. इथे तुम्हाला चवदार आणि ताजे स्नॅक्स मिळतील. बटाटाच्या वेफर्सपासून ते देसी तुपातील दालमोठ, शेंगाचे नमकीन आणि मिक्स नमकीनपर्यंत अनेक पर्याय इथे उपलब्ध आहेत. हे दुकान 130 वर्षांहून जास्त काळ आपली परंपरा जपत आहे
नेतरामची कचोरी
कटरा रोडवर असलेली नेतरामची कचोरी खूप प्रसिद्ध आहे. 100 वर्षांहून अधिक काळ चालणारं हे दुकान आजही लोकांच्या पसंतीचं आहे. इथे मिळणारी तिखट आणि कुरकुरीत कचोरी आणि त्या सोबत बटाटा आणि मटकी यांची मसालेदार चव खास आहे.
शिवा चाट भंडार
शिवा चाट भंडार हे दुकान 40-45 वर्षांपासून लोकप्रिय आहे. इथे तुम्हाला ताज्या आणि चवदार चाट पदार्थांचा अनुभव मिळेल. इथले बटाटा पुरी आणि पाणीपुरी नांदीच खाऊन बघा, जे तुम्हाला निश्चितच आवडतील.
पंडितजी चाट भंडार
कर्नलगंज मोहल्ल्यातील पंडित जी चाट भंडार हे इंडियन प्रेस चौकाजवळ आहे. इथल्या चाटची चव इतकी चविष्ट आहे की, एकदा टेस्ट केल्यावर ती चव आपल्याला कायम आठवत राहील. तुम्ही देखील महाकुंभ मेळा पाहून झाल्यावर इथल्या चाटचा अनुभव नक्की घ्या.
महाकुंभच्या धार्मिक वातावरणात, प्रयागराजमधील स्थानिक खाद्य पदार्थांचा आनंद घेणं तुमच्या प्रवासाला अजून खास बनवेल.