तमिळनाडूमध्ये बिर्याणीचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. सध्या या उद्योगाची एकूण किंमत 10,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये ₹2,500 कोटी हे मोठ्या ब्रँड्स आणि दुकानदारांचे, तर ₹7,500 कोटी छोटे हॉटेल्स आणि रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानांचे आहेत. चेन्नई शहरात सर्वाधिक बिर्याणीची विक्री केली जाते.
प्रसिद्ध बिर्याणी ब्रँड्स
तमिळनाडूमध्ये दिंडिगुल थलप्पाकट्टी, ज्युनियर कुप्पन्ना, अंजप्पर, बुहारी, सालेम आरआर बिर्याणी, पोंनुसामी आणि एसएस हैदराबादी बिर्याणी या ब्रँड्स खूप लोकप्रिय आहेत. अनेक छोटे विक्रेते आणि मध्यम आकाराच्या हॉटेल्स देखील बिर्याणी विकतात.
अनेक प्रकारची बिर्याणी
तमिळनाडूमध्ये बिर्याणीचे अनेक प्रकार आहेत, बिर्याणीसाठी ओळखले जाणारे तमिळनाडू शहरातील प्रमुख भाग म्हणजे कॉंगू प्रदेश (कोइंबतूर), अंबूर आणि दिंडिगुल. येथे चेन्नई मुस्लिम बिर्याणी (बासमती तांदूळ), कोंगू बिर्याणी (सीरागा सांबा तांदूळ), चेट्टीनाड बिर्याणी, अंबूर स्टाइल बिर्याणी, वल्लाजाह स्टाइल बिर्याणी आणि दिंडिगुल स्टाइल बिर्याणी या काही प्रसिद्ध प्रकार आहेत,” असे जूनियर कुप्पन्नाचे कार्यकारी संचालक बालचंदर आर. यांनी सांगितले. त्यांनी तमिळनाडूतील बिर्याणी बाजारावर सखोल संशोधन केले आहे. जूनियर कुप्पन्ना दरवर्षी सुमारे 12 लाख बिर्याण्या विकतो.
दिंडिगुल थलप्पाकट्टीची मोठी विक्री
तमिळनाडूमध्ये 65 शाखा असलेला प्रसिद्ध दिंडिगुल थलप्पाकट्टी हा ब्रँड दररोज 5,000 ते 6,000 किलो बिर्याणी विकतो . तसचं , सण आणि आठवड्याच्या शेवटी विक्रीत मोठी वाढ होतो, असे व्यवस्थापक सतीश डी. नागसामी सांगतात.
चिकन आणि मटण बिर्याणीची किंमत
रस्त्यावरील दुकांनात चिकन बिर्याणी ₹100 प्रति प्लेट आणि मटण बिर्याणी साधारणतः ₹150 ते ₹200 पर्यंत मिळते. लोकप्रिय ब्रँड्स ₹250 ते ₹400 मध्ये बिर्याणी विकतात, तर प्रीमियम ब्रँड्स ₹600 पर्यंत दर लावतात.खाद्य व्यवसायावर लक्ष ठेवणारे सांगतात की, किंमती या कशाही असुदेत , मटण बिर्याणी ही मुख्य पसंती असते, तर चिकन बिर्याणी एक स्वस्त पर्याय मानला जातो.
स्विगीच्या रिपोर्टानुसार विक्री
स्विगीच्या “How Chennai Swiggy’d in 2024” रिपोर्टनुसार, चेन्नईत 46.1 लाख चिकन बिर्याण्या खाल्ल्या गेल्या. एका यूझरने 66 बिर्याण्या एकाच ऑर्डरमध्ये मागवून नवा विक्रम केला.
बिर्याणी किट्सचे वाढते प्रमाण
बिर्याणीच्या वाढत्या मागणीमुळे, स्टार्ट-अप्स आणि मसाला ब्रँड्स देखील या वाढत्या बाजाराचा फायदा घेण्यासाठी संधी शोधत आहेत. चेन्नईतील कुक्ड स्टार्ट-अप दरमहा 30,000 बिर्याणी किट्स विकतो, यामुळे 1 लाख लोकांसाठी बिर्याणी तयार केली जाते. हे किट्स घराघरात वापरले जातात, कारण बिर्याणी बहुतेक वेळा आठवड्यातून एकदा बनवली जाते. एका प्रसिद्ध मसाला ब्रँडच्या संस्थापकांनी सांगितले की, ते लवकरच पाच वेगवेगळ्या बिर्याणी मसाल्याचे पॅक बाजारात आणणार आहेत.