प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्याच्या स्वच्छतेसाठी इस्त्रो आणि BARC संस्थाही सज्ज!

Mahakumbh 2025 : महाकुंभ 2025 मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविकांची राहण्याची व्यवस्था जवळपास 10 हजार एकर जागेवर करण्यात आली आहे. या सर्व परिसरात स्वच्छता राखण्याचं मोठं आव्हान प्रयागराज कुंभमेळा आयोजकांसमोर आहे. या 45 दिवसाच्या महाकुंभ मेळाव्यात परिसरातील कचऱ्याची व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी इस्त्रो आणि BARC संस्था कार्यरत असणार आहेत.
[gspeech type=button]

उत्तरप्रदेश इथं होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यासाठी प्रयागराज सज्ज होत आहे. महाकुंभ मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविकांची राहण्याची व्यवस्था जवळपास 10 हजार एकर जागेवर करण्यात आली आहे. या सर्व परिसरात स्वच्छता राखण्याचं मोठं आव्हान प्रयागराज कुंभमेळा आयोजकांसमोर आहे. या 45 दिवसाच्या महाकुंभ मेळाव्यात परिसरातील कचऱ्याची व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी इस्त्रो आणि BARC संस्था कार्यरत असणार आहेत.

स्वच्छतेसाठी अत्याधुनिक यंत्रणा

सलग 45 दिवस सुरू असणाऱ्या या महाकुंभ मेळाव्याच्या परिसरात दररोज निर्माण होणारा कचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन ही मोठी जबाबदारी असणार आहे. यासाठी ‘भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर’ (BARC) आणि ‘इस्त्रो’ ने विकसीत केलेल्या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून मानवी विष्ठा आणि सांडपाण्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं जाणार आहे.

या महाकुंभ मेळाव्यासाठी उत्तरप्रदेश सरकारकडून 7 हजार कोटी रुपयाचा खर्च केला जाणार आहे. त्यापैकी 1 हजार 600 कोटी रुपयाचा खर्च हा फक्त स्वच्छतेवर केला जाणार आहे. महाकुंभ मेळाव्याचा संपूर्ण परिसर हागणदारीमुक्त ठेवण्यासाठी 316 कोटी रुपयांचे फिरते शौचालये आणि त्यासंबंधित यंत्रणा उभी केली जाणार आहे.

हे ही वाचा : महाकुंभमेळाव्यासाठी महाराष्ट्रातील आयटीयूएस मरीनच्या ‘एम्पिबियस बोट’

आध्यात्मिकतेला स्वच्छतेची जोड

पुढच्या 45 दिवसांमध्ये प्रयागराजमध्ये कोट्यावधी भक्तगण भेट देणार आहेत. अनेकदा धार्मिक उत्सवाच्या ठिकाणी स्वच्छेतेकडे दुर्लक्ष केलं जातं. शौचालयाची पुरेशी सुविधा नसल्याने अस्वच्छता पसरलेली दिसते. मात्र, यंदा प्रयागराज येथे होणारा हा महाकुंभ मेळावा सगळ्यात मोठा हागणदार मुक्त असा धार्मिक मेळावा यादृष्टीने व्यवस्था उभी केली आहे.

यासाठी 1.45 लाख शौचालयांची व्यवस्था केली आहे. शौचालयाच्या सेप्टिक टाक्यांमध्ये गोळा केलेल्या मलमूत्रावर प्रक्रिया करण्यासाठी ‘प्रीफेब्रिकेटेड फेकल स्लज ट्रीटमेंड प्लाट्ंस’ उभे केले आहेत. 10 हजार एकर परिसरातलं ग्रे वॉटर हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोहोचविण्यासाठी कायमस्वरूपाच्या पाईपलाईन टाकून सुयोग्य अशी ड्रेनेज व्यवस्था निर्माण केली आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प, गाळ वाहून नेण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे.

हे ही वाचा : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कुंभमेळ्याचा समावेश

सांडपाणी व्यवस्थापनासाठी अद्दयावत तंत्रज्ञान

महाकुंभ मेळावा परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर आणि इस्त्रोने विकसीत केलेलं हायब्रीड ग्रॅन्युलर सिक्वेन्सिंग आणि जीओट्यूब तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. हायब्रीड ग्रॅन्युलर सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून बायोरीमिडिएशन तंत्रज्ञान वापरून मलमूत्र आणि अन्य सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्रत्येकी 2 यंत्रे हे प्रयागराज परिसरात तयार केलेल्या सेक्टर्समध्ये ठेवली जाणार आहेत.

भाविकांनी उघड्यावर शौच करु नये यासाठी विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्यासाठी झीरो टॉलरन्सचं धोरण आखलं आहे. याअंतर्गत फिरत्या शौचालयासह 15 हजार सेप्टिक टँक असलेल्या फायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमर पाइप्स आणि 10 हजारफायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमर सोक पिट्सची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात येणार आहे.

जवळपास 22 हजार प्री-फेब्रिकेटेड सेप्टीक टॅंक असलेली स्टीलची शौचकुपं आणि 17 हजार सोक पिट्स हे प्रयागराजच्या बाहेरच्या परिसरातील पार्किंग विभागात उभारण्यात आली आहेत. जिथे धार्मिक विधी होणार आहेत, त्या परिसरात तंबूच्या स्वरुपात असलेल्या शौचालयाची व्यवस्था केली आहे.

महाकुंभ मेळाव्याचा परिसर आणि भक्तांची संख्या

प्रयागराज मध्ये होणाऱ्या या महाकुंभ मेळाव्यासाठी जवळपास 40 कोटी भाविक प्रयागराजला भेट देणार आहेत. तर 50 लाख साधू हे 45 दिवस प्रयागराजमध्ये वास्तव्य करणार आहेत. जगातला सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून महाकुंभमेळाव्याची ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 183 देशांतील 33 लाखांहून अधिक लोकांनी महाकुंभच्या अधिकृत वेबसाइटला दिली भेट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वेध शिवकाळाचा: विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द
Media for Democracy : डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली.
‘बाईपणाची’ ताकद काय असते, आणि स्त्रीला असमान वागणूक दिल्यास समाजाची अधोगती कशी होते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ