दमदार म्युच्युअल फंड पोर्टफोलिओचे 15 सूत्रे 

Mutual fund : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना संयम ठेवणे अतिशय महत्त्वाचं असते. म्युच्युअल फंड हा ट्रेडिंग करण्याचा भाग नसून या मध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करुन अधिकाधिक नफा मिळवला जातो. गुंतवणुकीच्या या पर्यायामध्ये योग्य पद्धतीने गुंतवणूक करुन संपत्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या टिप्स खास आपल्यासाठी या लेखामध्ये दिल्या आहेत.
[gspeech type=button]

तुम्हाला म्युच्युअल फंडातून दमदार पोर्टफोलिओ हवा असल्यास खालील 15 मूलभूत सूत्रे पाळा –

1. गोष्टी सोप्या ठेवा, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 5-6 फंडांपेक्षा जास्त नसावे.

2. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक किमान 5-6 वर्षे आवश्यक आहे, जर त्यापेक्षा कमी वेळासाठी तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्ही नशिबावर खेळण्याचा प्रयत्न करत आहात. त्याऐवजी FD करा.

3. ⁠SIP, SIP आणि अधिक SIP… निर्दयी गुंतवणूक

4. उत्पन्न – खर्च = गुंतवणूक ह्या नियमाने कधीच दमदार पोर्टफोलिओ बनू शकत नाही, पोर्टफोलिओ दमदार बनवण्यासाठी एकच नियम आहे तो म्हणजे “उत्पन्न – गुंतवणूक = खर्च”

5. चढत्या मार्केट मध्ये विकून, पडलेल्या मार्केट मध्ये परत गुंतवणूक करायची स्वप्नं बघू नका. प्रॉफिट बुक करू नका. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची ही सर्वात मोठी चूक आहे, म्युच्युअल फंड हे ट्रेडिंगसाठी नसतात.

6. कोणतेही सर्वोत्तम फंड नाहीत, तुमची सातत्याने केलेली गुंतवणूक आणि संयम तुम्हाला श्रीमंत बनवते, उत्तम फंड बनवत नाही, कारण प्रत्येक फंड त्याच्या चढ-उतारातून जातो.

7. ⁠कोणत्याही टॉम-डिक-हॅरी ॲप्समधील टॉप 5 फंड पाहून गुंतवणूक करू नका. एकदा नवीन डेटा पॉप्युलेट झाल्यानंतर आजच्या टॉप 5 ची जागा नवीन टॉप 5 ने घेतलेली असते.

8. गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या, गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणे हा पोरखेळ नव्हे.

9. ध्येयाशिवाय कोणतीही गुंतवणूक नाही. प्रत्येक गुंतवणुकीला Goal हवाच…

10. बाजार खाली असताना आनंदी रहा, कारण त्या वेळी तुमची SIP सर्वात मोठी संपत्ती निर्माण करण्यात व्यस्त असते.

11. म्युच्युअल फंडामध्ये तुमचे पैसे कधीही शून्य होऊ शकत नाहीत.

12. जो पर्यंत तुमचा म्युचुअल फंडाचा पोर्टफोलिओ तयार होत नाही, तोपर्यंत थीमॅटिक, उद्योग विशिष्ट, कमोडिटी विशिष्ट MF टाळा.

13. सोन्या/चांदीचा वापर हेजिंगच्या उद्देशाने मोठे गुंतवणूकदार करत असतात, रिटेल गुंतवणूकदारांप्रमाणे नव्हे, तर HNI गुंतवणूकदारांसारखा विचार करा.

14. Term Plan (Life Insurance) आणि मेडिक्लेम घेऊन आपल्या संपत्तीचे संरक्षण करण्यास विसरू नका. मोठ्या आजारातून तुम्ही नक्कीच बरे होऊ शकता, पण योग्य इन्शुरन्स कव्हर नसेल, तर तुम्हाला झालेला आजार तुमचा पोर्टफोलिओ नक्की मारतो.

15. युलिप आणि मनी बॅक पॉलिसी निरुपयोगी आहेत. ते पुरेसं कव्हरही देत ​​नाहीत आणि पुरेसा परतावाही देत ​​नाहीत. त्याऐवजी SIP + टर्म प्लॅन पर्याय वापरा.

2 Comments

  • Kiran Yelave

    Nice Blog Charu

  • सौ अनघा प्रमोद करलकर

    महत्त्वपूर्ण माहिती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 Responses

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ