तुम्ही खात असलेल्या फळभाज्या सुरक्षित आहेत का? भेसळ ओळखण्यासाठी काही सोप्या पद्धती जाणून घ्या.

veggies and fruits adulterated : आजकाल भाजीपाला आणि फळांमध्ये भेसळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. ताज्या आणि आकर्षक दिसण्यासाठी त्यांना कृत्रिम रंग, रसायने किंवा इतर हानिकारक पदार्थ लावले जातात. ही भेसळ तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
[gspeech type=button]

आजकाल भाजीपाला आणि फळांमध्ये भेसळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. ताज्या आणि आकर्षक दिसण्यासाठी त्यांना कृत्रिम रंग, रसायने किंवा इतर हानिकारक पदार्थ लावले जातात. ही भेसळ तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र, काही सोप्या पद्धतींनी तुम्ही फळं आणि भाज्यांमधील भेसळ ओळखू शकता.

हिरवे वाटाणे, हरभऱ्यातील भेसळ तपासण्याची सोप्पी पद्धत 

हरभऱ्याच्या शेंगा किंवा हिरवे वाटाणे ग्राहकांना ताजे दिसावेत म्हणून त्यांना रंग लावला जातो. हेच तपासण्यासाठी तुम्ही पुढील सोपी पद्धत वापरू शकता

एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यात काही हरभऱ्याच्या शेंगा टाका आणि अर्धा तास त्या तश्याच पाण्यामध्ये ठेवा. जर पाणी हिरवट झाले, तर हरभऱ्यात रसायनांची भेसळ आहे हे लगेच समजेल

हिरव्या भाज्यांमधील मॅलाकाइट ग्रीन ओळखणे 

हिरव्या भाज्या ताज्या दिसण्यासाठी त्यांना ‘मॅलाकाइट ग्रीन’ नावाचा रासायनिक रंग लावला जातो. ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. ही भेसळ ओळखण्यासाठी दोन पद्धती वापरता येतात:

पहिली पद्धत 

कापसाचा एक गोळा तेलात भिजवून घेऊन तो कापूस भाजीवर चोळा, जर कापूस हिरवट झाला, तर भाजीमध्ये रसायने आहेत.

दुसरी पद्धत 

एका कागदावर पाणी शिंपडून त्यावर भाजी ठेवा आणि काही सेकंदांनी भाजी काढा. जर कागदावर हिरवा डाग दिसला, तर भाजीत रासायनिक रंग वापरला गेला आहे.

शेंगदाण्यांतील रोडामाईन भेसळ 

शेंगदाण्यांना आकर्षक गुलाबी रंग देण्यासाठी ‘रोडामाईन’ रंग वापरला जातो. ही भेसळ ओळखण्यासाठी

कापसाचा गोळा पाण्यात किंवा तेलात भिजवा. त्यानंतर तो शेंगदाण्याच्या सालीवर चोळा. जर कापूस गुलाबी झाला, तर रोडामाईन रंगाची यात भेसळ केली आहे हे समजेल.

फळांमध्ये होणारी भेसळ

सफरचंद ताजे आणि चमकदार दिसण्यासाठी बाहेरुन त्यावर वॅक्सचा लेप लावला जातो. यामुळे सफरचंदाची चमक वाढते पण ही भेसळ आपल्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. ही भेसळ ओळखण्यासाठी

सफरचंदाच्या सालावर व्हाईट व्हिनेगर लावुन त्यानंतर, ती सफरचंद गरम पाण्याने स्वच्छ करुन घ्यायची यानंतर, सफरचंदाला हात लावल्यावर तुम्हाला त्यावर वॅक्ससारखा थर दिसेल ह्या वॅक्स थराला किचन नाइफने काढून टाकायचं.

भेसळयुक्त भाज्या आणि फळांचे सेवन केल्याने विषबाधा, ऍलर्जी, आणि दीर्घकालीन आजारही होऊ शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Tea : आपल्या देशात अनेक ठिकाणी असा चहा मिळतो जो आपल्या घरात बनवलेल्या चहापेक्षा चवीला वेगळा असतो. साधारणपणे, चहाची चव
Mahakumbh 2025 : महाकुंभ हा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे. या धार्मिक अनुभवासोबतच, प्रयागराजमधील खाद्यपदार्थांची चवही खूपच खास
The biryani market in Tamil Nadu : तमिळनाडूमध्ये बिर्याणीचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. सध्या या उद्योगाची एकूण किंमत 10,000 कोटी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ