2024 मध्ये डिसेंबर महिन्यात GST संकलनात 7.3% ने वाढ

GST : 1 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2024 च्या डिसेंबर महिन्यात भारतातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलन 7.3 टक्क्यांनी वाढून 1.77 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आहे.
[gspeech type=button]

1 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2024 च्या डिसेंबर महिन्यात भारतातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलन 7.3 टक्क्यांनी वाढून 1.77 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमध्ये जीएसटी संकलनात 2.97 टक्क्यांची घट झाली आहे.

2024 च्या जीएसटी संकलनात 9.10% वाढ

वर्ष 2024 च्या सुरूवातीपासूनचे जीएसटी संकलन एकूण 16.33 लाख कोटी रुपये झाले असून, यामध्ये 9.10 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. डिसेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलन 1.65 लाख कोटी रुपये होते. डिसेंबर 2024 मध्ये यात 7.3% वाढ झाली आहे.

GST संकलनाचा तपशील

डिसेंबर 2024 मध्ये एकूण 1,76,857 कोटी रुपयांचे GST संकलन झाले. त्यात केंद्रीय GST (CGST) 32,836 कोटी रुपये, राज्य GST (SGST) 40,499 कोटी रुपये, एकात्मिक GST (IGST) 47,783 कोटी रुपये आणि उपकर (Cess) 11,471 कोटी रुपये जमा झाले आहेत.

देशांतर्गत आणि आयात GST संकलन

देशांतर्गत व्यापारातून 1.32 लाख कोटी रुपये GST जमा झाले. त्यात 8.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयातीवरून GST संकलन 4 टक्क्यांनी वाढून 44,268 कोटी रुपये इतके झाले आहे.

GST परतफेडीमध्ये 31% वाढ

2024 च्या डिसेंबर महिन्यात 22,490 कोटी रुपयांची GST परतफेड करण्यात आली. ही परतफेड डिसेंबर 2023 च्या तुलनेत 31% जास्त आहे. परतफेडीनंतर, निव्वळ GST संकलन 3.3 टक्क्यांनी वाढून 1.54 लाख कोटी रुपये झाले.

GST कौन्सिलची 55वी बैठक

21 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे GST कौन्सिलची 55 वी बैठक झाली. या बैठकीत आर्थिक क्षेत्राशी संबंधित काही महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या. यामध्ये अन्न महागाई, बेरोजगारी, ग्रामीण रोजगार निर्मिती आणि भांडवली खर्च वाढवणे यासारख्या विषयांवर चर्चा झाली.

महत्त्वाच्या शिफारशी

• जुन्या आणि वापरलेली इलेक्ट्रिक वाहने, पेट्रोलवर चालणारी लहान वाहने व डिझेल कारवरील GST दर 12% वरून 18% पर्यंत वाढवण्याची शिफारस.

• लक्झरी घड्याळे आणि शूजसारख्या उच्च दर्जाच्या वस्तूंवरील GST दर वाढवण्याचा प्रस्तावामुळे दरवर्षी 22,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

GST संकलनाचा सारांश

• डिसेंबर 2024 मध्ये GST संकलन: 1,77,000 कोटी रुपये

• 2024 च्या सुरुवातीपासून GST संकलन: 16.33 लाख कोटी रुपये

• देशांतर्गत व्यापारातून GST: 1.32 लाख कोटी रुपये (8.4% वाढ)

• आयातांवरील GST: 44,268 कोटी रुपये (4% वाढ)

• GST परतफेडी: 22,490 कोटी रुपये (31% वाढ)

• निव्वळ GST संकलन: 1.54 लाख कोटी रुपये (3.3% वाढ)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ